डिजेआयचा फँटम ४ अ‍ॅडव्हान्स्ड ड्रोन

0

डिजेआय कंपनीने आता फँटम ४ अ‍ॅडव्हान्स्ड या नावाने ड्रोन सादर केले असून ते फँटम ४ या मॉडेलची जागा घेणार आहे.

डिजेआय कंपनी ड्रोन उत्पादनात आघाडीवर आहेत. या कंपनीच्या फँटम या मालिकेतील विविध मॉडेल्सला जगभरात मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली आहे. या पार्श्‍वभूमिवर आता डिजेआयने फँटम ४ अ‍ॅडव्हान्स्ड या नव्या मॉडेलची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान फँटम ४ या आधीच्या मॉडेलचे उत्पादन ३० एप्रिलपासून थांबविण्यात येणार असून त्याची जागा फँटम ४ अॅडव्हान्स्ड घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष बाब म्हणजे नवीन मॉडेल हे आधीपेक्षा ५० डॉलर्सने कमी म्हणजेच १३४९ डाॅलर्स मूल्यात ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. यात २० मेगापिक्सल्सचा सेन्सर असून याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार आहे. यात डिजेआयच्याच फँटम ४ प्रो या महागड्या मॉडेलप्रमाणेच ‘इंटिलेजियंट फ्लाईट मोड’ची सुविधा आहे. याच्या मदतीने हे ड्रोन कुणीही आपल्याला हव्या त्या मार्गावरून सहजपणे उडवू शकतो. तसेच यात एखादा मार्ग निश्‍चित करू शकतो. अथवा ते कोणत्याही व्यक्तीला फॉलोदेखील करू शकते. हे मॉडेल समोरील आणि खालच्या बाजूने येणार्‍या अडथळ्यांना ओळखून आपला मार्ग बदलू शकते.

फँटम ४ अ‍ॅडव्हान्स्ड या मॉडेलमध्ये उत्तम दर्जाचा इनबिल्ट स्क्रीन असणारा रिमोट कंट्रोल प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने अतिशय सुलभ पध्दतीने या ड्रोनचे नियंत्रण करता येते. ‘डिजेआय गो ४’ या अ‍ॅपच्या मदतीने या मॉडेलचे लाईव्ह स्ट्रीमिंगदेखील रिमोट कंट्रोलच्या डिस्प्लेवर पाहणे शक्य असून ते तात्काळ सोशल मीडियात शेअरदेखील करणे शक्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here