डिजेआयचे दोन नवीन ड्रोन

0

ड्रोन उत्पादनात आघाडीवर असणार्‍या डिजेआय कंपनीने आपल्या मॅविक प्रो आणि फँटम ४ प्रो या मॉडेल्सच्या सुधारित आवृत्ती लाँच केल्या आहेत.

डिजेआय कंपनीने आधीच मॅविक प्रो आणि फँटम ४ प्रो हे ड्रोन बाजारपेठेत उतारले असून याला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला आहे. या पार्श्‍वभूमिवर हे दोन्ही ड्रोन सुधारित फिचर्ससह ग्राहकांना सादर करण्यात आले आहेत. मॅविक प्रो या मॉडेलमध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्स असले तरी यातील बॅटरी ही तुलेनेत कमी बॅकअप देणारी असल्याची ग्राहकांची तक्रार होती. या अनुषंगाने मॅविक प्रो या मॉडेलच्या सुधारित प्लॅटीनम आवृत्तीमध्ये चांगल्या दर्जाची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. यामुळे हे ड्रोन आता ३० मिनिटांपर्यंत उड्डाण करू शकणार आहे. बहुतांश ड्रोन २०-२५ मिनिटांपेक्षा जास्त उड्डाण करू शकत नाही. या पार्श्‍वभूमिवर, मॅविक प्रो मॉडेलची सुधारित आवृत्ती लक्षणीय ठरणार आहे. तसेच मूळ मॉडेलपेक्षा हे ड्रोन तब्बल ६० टक्के कमी आवाज करत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर यातील पंखदेखील अधिक कार्यक्षम करण्यात आले आहेत. याचे जागतिक बाजारपेठेतील मूल्य १०९९ डॉलर्स इतकी आहे.

यासोबत डिजेआयने आपल्या र्फँटम ४ प्रो या मॉडेलची ओबसिडीयन ही नवीन आवृत्तीदेखील सादर केली आहे. यात मॅट ग्रे या रंगाची मॅग्नेशियम शेलचे आवरण प्रदान करण्यात आलेले असेल. या आवरणावर इलेक्ट्रो-प्लेटींग केलेली असेल. यावर बोटांचे ठसे उमटणार नाहीत. यातील उर्वरित फिचर्स हे मूळ मॉडेलप्रमाणेच असतील तर डिजेआयने अलीकडेच लाँच केलेल्या स्पार्क या मिनी ड्रोनमध्ये आता स्पिअर हे नवीन फिचर देण्यात येणार आहे. याच्या अंतर्गत कुणीही फिश आय लेन्सच्या मदतीने सेल्फी व्हिडीओ काढून तो थेट सोशल मीडियावर शेअर करू शकेल. याचे मूल्य १४९९ डॉलर्स इतके आहे. डिजेआय कंपनीने आपले हे नवीन ड्रोन प्रदर्शीत केले असून येत्या काही दिवसात ग्राहकांना हे मॉडेल खरेदी करता येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here