डिजेआयचे माविक एयर ड्रोन : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

डिजेआय कंपनीने माविक एयर या नावाने नवीन ड्रोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून या घडी होणार्‍या ड्रोनमध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

डिजेआय कंपनीच्या माविक प्रो आणि स्पार्क या मॉडेलच्या मधील फिचर्स यात देण्यात आले आहेत. अर्थात यात स्पार्क या मॉडेलपेक्षा उच्च फिचर्स असले तरी माविक प्रो पेक्षा चांगले फिचर्स नाहीत. याचे जागतिक बाजारपेठेतील मूल्य ७९९ डॉलर्स (सुमारे ५०.७ हजार रूपये) इतके आहे.

फिचर्सचा विचार केला असता माविक एयर या मॉडेलमधील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे फोल्डींग डिझाईन होय. यामुळे हे ड्रोन अतिशय आटोपशीर आकाराचे असून ते सहजपणे कुठेही नेणे शक्य आहे. यात १२ मेगापिक्सल्स क्षमतांच्या प्रतिमा तर फोर-के क्षमतेचे छायाचित्रीकरण करणे शक्य आहे. कोणत्याही ड्रोनसाठी बॅटरी हा सर्वात महत्वाचा घटक असतो. या अनुषंगाने यात २१ मिनिटांचा फ्लाईट टाईम प्रदान करणारी बॅटरी देण्यात आलेली आहे. यात अडथळ्यांना ओळखून त्यांना टाळून पुढे जाण्यासाठी अतिशय उत्तम दर्जाचे सेन्सर्स प्रदान करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here