डील पक्की…वॉलमार्टच्या अधिपत्याखाली येणार फ्लिपकार्ट !

0

गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असणार्‍या वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टच्या डीलवर आता शिक्कामोर्तब झाले असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून वॉलमार्ट ही रिटेलमधील विख्यात कंपनी फ्लिपकार्ट या भारतातील अग्रगण्य ई-कॉमर्स कंपनीचे अधिग्रहण करणार असल्याची चर्चा सुरू होती. यावर आता दोन्ही कंपन्यांच्या संचालकांनी शिक्कामोर्तब केले आहे. यानुसार तब्बल १६ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे १.०७ लाख करोड रूपयांमध्ये हा व्यवहार झाला आहे. ई-कॉमर्सच्या क्षेत्रातले हे जगातील सर्वात मोठे अधिग्रहण ठरले आहे. या माध्यमातून आता फ्लिपकार्टमधील तब्बल ७७ टक्के वाटा वॉलमार्टकडे आला आहे. तसेच यामुळे फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांची कंपनीतून ‘एक्झीट’ होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.

वॉलमार्टची अमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीसोबतचे वैमनस्य कुणापासून लपून राहिलेले नाही. या दोन्ही कंपन्यांनी एकमेकांना प्रचंड आव्हान दिले आहे. एकीकडे वॉलमार्टच्या व्यवसायावर अमेझॉनने डल्ला मारला आहे. तर दुसरीकडे अमेझॉनच्या ऑनलाईन व्यवसायाला तोड देण्यासाठी वॉलमार्ट आटोकाट प्रयत्न करत आहेत. या अनुषंगाने भारतीय बाजारपेठेत अमेझॉनचीच शाखा असणारी ‘अमेझॉन इंडिया’ आणि वॉलमार्टच्या पंखाखाली आलेल्या फ्लिपकार्टमध्ये जोरदार धमासान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here