डुकाटी मॉन्स्टर ८२१ दुचाकी भारतात सादर

0

डुकाटी या इटालियन कंपनीने भारतीय बाजारपेठेत मॉन्स्टर ८२१ (२०१८) ही उच्च श्रेणीतील दुचाकी सादर करण्याचे घोषीत केले आहे.

डुकाटी मॉन्स्टर ८२१ (२०१८) या बाईकचे एक्स-शोरूम मूल्य ९.५१ लाख रूपये असून याची अगावू नोंदणी सुरू करण्यात आली आहे. तथापि, ग्राहकांना प्रत्यक्षात मे अखेर अथवा जून महिन्याच्या प्रारंभी ही दुचाकी प्रत्यक्षात मिळणार आहे. हे मॉडेल भारतात पहिल्यांदा २०१६ साली सादर करण्यात आले होते. मात्र याला २०१७ मध्ये डिसकंटिन्यू करण्यात आले होते. आता या ताज्या आवृत्तीच्या माध्यमातून ही बाईक पुन्हा एकदा बाजारपेठेत उतारण्यात आली आहे. डुकाटीच्या मॉन्स्टर या मालिकेतील आजवरच्या मॉडेल्सनुसार याची बांधणी करण्यात आली आहे. याच्याशी सुसंगत असे हेड आणि टेल लँप यात देण्यात आले आहेत. तर यात ड्युअल एक्झॉस्ट प्रणाली देण्यात आली आहे. यामध्ये अतिशय स्टायलीश लूक आणि याच्याशी संबंधीत फ्युअल टँक प्रदान करण्यात आली आहे. यात आधीच्या मॉडेलनुसारच ८२१ सीसी क्षमतेचे एल-ट्विन या प्रकारातील इंजिन असले तरी ते बीएस-४ या उत्सर्जनाच्या मानकाशी सुसंगत असणार आहे. याला ६-स्पीड गिअर्सची जोड देण्यात आली आहे. यामध्ये अर्बन, टुअरींग आणि स्पोर्टस हे तीन ड्रायव्हींग मोड दिलेले आहेत.

डुकाटी मॉन्स्टर ८२१ (२०१८) या मॉडेलमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहेत. सुरक्षेसाठी यात थ्री-लेव्हल एबीएस (अँटी लॉक ब्रेकींग सिस्टीम) आणि ८ लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल प्रणाली देण्यात आल्या आहेत. यातील उर्वरित फिचर्स आधीच्या मॉडेलनुसारच असतील. यात एलईडी हेडलँप आणि टेललँपचा समावेश असेल. तर नवीन आवृत्तीत डिजीटल क्लस्टर देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here