ड्युअल टोन रंगसंगतीत मिळणार टिव्हीएस स्टार सिटी प्लस

0

टिव्हीएस कंपनीने आपली टिव्हीएस स्टार सिटी प्लस ही दुचाकी ड्युअल टोन रंगसंगतीत सादर केली असून या मॉडेलचे एक्स-शोरूम मूल्य ५०,५३४ रूपये असेल.

टिव्हीएस स्टार सिटी प्लस मॉडेलची ही नवीन आवृत्ती काळा-लाल, काळा-निळा आणि लाल-काळा या दुहेरी रंगांच्या पर्यायांमध्ये (ड्युअल टोन) भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आली आहे. याशिवाय या दुचाकीत थ्री-डी क्रोम लेबलदेखील देण्यात आलेले आहे. यातील उर्वरित फिचर्स मात्र मूळ मॉडेलनुसारच असतील. अर्थात टिव्हीएस स्टार सिटी प्लसच्या नवीन आवृत्तीतही ११० सीसी क्षमतेचे इंजिन प्रदान करण्यात आले आहे. हे इंजिन ४ स्पीड गिअर्सला संलग्न करण्यात आले आहे. यात ऑटो हेडलँप ऑन, डिजी-अ‍ॅनालॉग इन्स्ट्रूमेंटेशन कन्सोल, अ‍ॅडजस्ट होणारे मागचे शॉक अ‍ॅबसॉर्बर, ट्युबलेस टायर्स तसेच ड्युअल टोन सीट आदी फिचर्स असतील. महत्वाची बाब म्हणजे टिव्हीएस स्टार सिटी प्लसची नवीन आवृत्ती तब्बल ८६ किलोमीटर प्रति-लिटर इतके मायलेज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here