ड्रूमवर मिळणार कस्टमाइज्ड बाईक

0

ड्रूम या भारतातील आघाडीच्या ऑनलाइन ऑटोमोबाइल बाजारपेठेने कस्टमाइज्ड बाईक विभागात प्रवेश केला आहे.

सध्या दुचाकी विकत घेऊन तिच्यात आवडीप्रमाणे सुधारणा करून वापरण्याकडे तरुणाईचा कल आहे. ग्राहकांची ही गरज लक्षात घेत आपल्या मंचावर कस्टमाइज्ड बाईक विक्रीची सुविधा ड्रूमद्वारे सुरु करण्यात आली आहे. या कस्टमाइज्ड बाईक रु. ७०,००० पासून उपलब्ध आहेत. या विभागाच्या माध्यमातून ड्रूम ग्राहकांना मॉडिफिकेशन डिझाईन आणि मॉडिफाइड बाईकच्या संकलनातून निवड करण्यास सक्षम बनविते.

आपल्या या नवीन सेवेबाबत ड्रूमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप अग्रवाल म्हणाले की, “चाकांवर चालणारे प्रत्येक वाहन ड्रूम या मंचावर उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे. आजची युवा पिढी कस्टमाइज्ड बाईकसाठी क्रेझी आहे. ड्रूम ही युवा केंद्रित कंपनी असून आपल्या युवा ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या बाईक्स उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने आम्ही कस्टमाइज्ड बाइक विभागात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे मार्केट लीडर म्हणून आमची स्थिती अधिक भक्कम होण्यास मदत होईल आणि नवीन ग्राहक आणि बाजारपेठापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही अधिक सक्षम बनू असा मला विश्वास आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here