ड्रोन करणार हृदयाच्या ठोक्यांचे मापन !

0

(प्रतिकात्मक छायाचित्र.)
ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञांनी नवीन वैशिष्ट्यपूर्ण ड्रोन विकसित केले असून याच्या मदतीने अगदी ६० मीटर अंतरावर असणार्‍या व्यक्तीच्या हृदयाच्या ठोक्यांचे मापन करता येणार आहे.

ड्रोन आता जवळपास आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनू पाहत आहे. याचा सर्वात लोकप्रिय वापर हा फोटो व व्हिडीओग्राफीच्या माध्यमातून होत असल्याचे आपणा सर्वांना माहितच आहे. तथापि, ड्रोन हे असंख्य प्रकारांमध्ये वापरले जाऊ शकते. यात बाँब टाकण्यापासून ते विविध वस्तूंच्या डिलीव्हरीसाठी ड्रोन वापरले जात आहे. यातच आता ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञांनी ड्रोन वापरून अगदी ६० मीटर अंतरावर असणार्‍या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके मोजण्याची प्रणाली विकसित केली आहे. यासाठी अतिशय उत्तम दर्जाच्या सेन्सर्सचा वापर करण्यात आला आहे. मूळचे भारतीय असणारे तंत्रज्ञ जवान चहल यांच्या मार्गदर्शनाखाली चमूने हे ड्रोन विकसित केले आहे. याचा आपत्कालीन स्थितीमध्ये मदत पुरवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. अनेक दुर्घटनांमध्ये कोणता व्यक्ती जीवीत आहे वा कोणता मृत? हे लवकर कळत नाही. यामुळे अनेकांना वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे प्राण गमवावे लागतात. मात्र हे ड्रोन दुरवरूनच हृदयाच्या ठोक्यांवरून धुगधुगी असणार्‍याला तातडीने वैद्यकीय उपचार पुरवू शकते. विशेष म्हणजे यात फेसियल रेकग्नीशन प्रणालीचाही वापर करण्यात आला आहे. यामुळे संबंधीत व्यक्तीची पटकन ओळख पटविणेही शक्य होणार आहे. विविध रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये याचा वापर करता येणार आहे. हे ड्रोन ऑस्टे्रलियन लष्कराच्या मदतीने विकसित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here