तीन कॅमेर्‍यांनी युक्त एचटीसी यू ११ आईज

0

एचटीसी कंपनीने तीन कॅमेर्‍यांसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारा एचटीसी यू ११ आईज हा स्मार्टफोन ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे.

एचटीसी यू ११ आईज या मॉडेलमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ६५२ हा अत्यंत गतीमान प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी रॅम तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येईल. यातील डिस्प्ले हा ६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच १०८० बाय २१६० पिक्सल्स क्षमतेचा एलसीडी टचस्क्रीन डिस्प्ले आहे. याचा अस्पेक्ट रेशो १८:९ असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारा असून यात ३,९२० मेगापिक्सल्स क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

एचटीसी यू ११ आईज या मॉडेलमध्ये मागील बाजूस एक तर ड्युअल सेल्फी कॅमेरा दिलेले आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या सेल्फी प्रतिमा घेता येतील. या ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये बोके इफेक्ट देण्याची सुविधाही प्रदान करण्यात आली आहे. तसेच यात ब्युटी मोड आणि फेस स्टीकर्स हे अन्य विशेष फिचर्सदेखील असतील. तर यातील १२ मेगापिक्सल्सच्या मुख्य कॅमेर्‍यात ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन, एलईडी फ्लॅश आणि अल्ट्रा स्पीड ऑटो-फोकस आदी फिचर्स आहेत.

एचटीसी यू ११ आईज या मॉडेलमध्ये एज सेन्सर प्रणाली देण्यात आली आहे. याच्या मदतीने टचस्क्रीन डिस्प्लेस स्पर्श न करतांनाही फक्त कडांना हाताने दाबून फोटो काढणे, कोणतेही अ‍ॅप कार्यान्वित करणे आदी फंक्शन्स पार पाडता येतात. तसेच याच पध्दतीचा वापर करून कुणीही समोरील व्यक्तीस टेक्स्ट अथवा व्हॉईस मॅसेज पाठवू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here