द ग्रेट ऑनर सेलमध्ये विविध प्रॉडक्टवर आकर्षक सवलती

0

हुआवे कंपनीची मालकी असणार्‍या ऑनरतर्फे फ्लिपकार्टवर तीन दिवसीय द ग्रेट ऑनर सेल जाहीर करण्यात आलेला आहे. यात आकर्षक सवलती जाहीर करण्यात आला आहे.

सध्या बहुतांश ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांसाठी विविध सेल सादर करत आहेत. याच्या जोडीला विविध कंपन्यादेखील याच माध्यमातून ग्राहकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या अनुषंगाने हुआवे कंपनीची मालकी असणार्‍या ऑनरने २७ तारखेपासून तीन दिवसांपर्यंत सेल जाहीर केला आहे. फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवर २७ ते ३० ऑगस्टच्या दरम्यान द ग्रेट ऑनर सेल या नावाने याला जाहीर करण्यात आले आहे. अर्थात हा सेल फक्त फ्लिपकार्टवरून सादर करण्यात आला आहे. यात ऑनर कंपनीच्या विविध प्रॉडक्टवर अतिशय आकर्षक सवलती देण्यात आल्या आहेत. या सेलमध्ये ऑनरने अलीकडेच लाँच केलेल्या ९एन या मॉडेलचा एक तासापर्यंत फ्लॅश सेल होणार आहे. यामध्ये ऑनर ९ लाईट या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज असणार्‍या व्हेरियंटला १४,९९९ रूपयात उपलब्ध करण्यात येत आहे. तर यासाठी तीन हजार रूपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरदेखील जाहीर करण्यात आली आहे.

या सेलमध्ये ऑनर १० या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनला तब्बल ५ हजार रूपयांच्या सवलतीमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. अर्थात हे मॉडेल २७,९९९ रूपयात खरेदी करता येणार आहे. तर ऑनर ९ आय हे मॉडेल ग्राहकांना १२,९९९ रूपयात उपलब्ध करण्यात आले आहे. २७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून हा सेल सुरू करण्यात आला असून ३० ऑगस्टपर्यंत हा सुरू राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here