नवीन सॅमसंग गॅलेक्सी जे १

0

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे १ या स्मार्टफोनच्या नवीन व्हेरियंटला दुबईत सादर केले आहे. हे मॉडेल किफायतशीर दरातील आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे १ हा स्मार्टफोन भारतात गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ७,१९० रूपयांना लॉंच करण्यात आला होता. यात ४.३ इंच आकारमानाचा ८०० बाय ४८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले होता. याची रॅम ५१२ एमबी तर इनबिल्ट स्टोअरेज ४ जीबी इतके होते. आता विविध फिचर्स अद्ययावत करत याचे नवीन व्हेरियंट दुबईत लॉंच करण्यात आले आहे. तेथील जंबो इलेक्ट्रॉनिक या शॉपीजमधून याला लॉंच करण्यात आले आहे.

नवीन सॅमसंग गॅलेक्सी जे १ हे मॉडेल ४.५ इंच आकारमानाच्या ४८० बाय ८०० पिक्सल्स क्षमतेच्या सुपर अमोलेड डिस्प्लेने सज्ज आहे. याची रॅम एक जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ते वाढविणे शक्य आहे. यातील कॅमेरे ५ आणि २ मेगापिक्सल्स क्षमतेचे असून बॅटरी २०५० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. यात फोर-जी आणि थ्री-जी या नेटवर्क कनेक्टिव्हिटींसह वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस, मायक्रो-युएसबी, जीपीएस आदी फिचर्स आहेत. भारतात हा स्मार्टफोन येत्या काही दिवसांमध्ये सुमारे नऊ हजार रूपयांच्या आसपास लॉंच होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here