पॅनासोनिकचा बजेट स्मार्टफोन

0

पॅनासोनिक कंपनीने भारतात अवघ्या ४,९९९ रूपयांना टी ५० हा स्मार्टफोन लॉंच केला आहे.

पॅनासोनिकच्या या मॉडेलमध्ये ४.५ इंच आकारमानाचा आणि ४८० बाय ८५४ पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले दिलेला आहे. याची रॅम १ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी इतके असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या सहाय्याने ३२ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यात ५ आणि २ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे आहेत. तर यात १६०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे यात पोझ मोड, चाईल्ड मोड आदी फिचर्सदेखील देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन अँड्रॉईडच्या लॉलिपॉप प्रणालीवर चालत असून यावर पॅनासोनिकचा ‘सेल’ हा इंटरफेस देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here