पॅनासोनिकचे व्हर्च्युअल असिस्टंटयुक्त स्मार्टफोन

0
Panasonic-Eluga-Ray-Max

पॅनासोनिकने एल्युगा रे मॅक्स आणि एल्युगा रे एक्स हे दोन स्मार्टफोन भारतात लाँच केले असून यात कंपनीने विकसित केलेला ‘अर्बो’ हा व्हर्च्युअल असिस्टंट देण्यात आला आहे.

पॅनासोनिकचे हे दोन्ही मॉडेल फ्लिपकार्ट या ई-पोर्टलवरून ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. यात ३२ जीबी स्टोअरेज क्षमतेचा एल्युगा रे मॅक्सचे मूल्य ११,४९९ तसेच ६४ जीबीचे मॉडेल १२,४९९ रूपयांत मिळेल. तर एल्युगा रे एक्स हे मॉडेल ८९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना खरेदी करता येईल. गुगल आणि अ‍ॅपलसारख्या कंपन्यांचे व्हर्च्युअल असिस्टंट हे खूप लोकप्रिय झाले आहेत. या पार्श्‍वभूमिवर पॅनोसोनिक कंपनीने ‘अर्बो’ हा असिस्टंट विकसित केला असून तो ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा दावा करण्यात आला आहे.

फिचर्सचा विचार करता-एल्युगा रे मॅक्स या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात ६४ बीट ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असेल. याची रॅम चार जीबी असून वर नमुद केल्यानुसार ३२ आणि ६४ जीबी स्टोअरेजचे दोन पर्याय असतील. या दोन्ही व्हेरियंटमध्ये मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत स्टोअरेज वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यातील कॅमेरे १६ आणि ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे असून यात ३००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे पॅनासोनिक एल्युगा रे एक्स या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकाराचा आणि एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात १६ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे तर ४००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. हे दोन्ही मॉडेल अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारे आहेत. तसेच दोन्ही मॉडेलमध्ये क्विक चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here