पॅरटचे नवीन ड्रोन दाखल

0

पॅरट कंपनीने आपत्कालीन स्थिती तसेच कृषी क्षेत्रात उपयोगात पडणारे ड्रोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

पॅरट कंपनीने आधीदेखील ड्रोन सादर केले असले तरी ते बहुतांश एंट्री लेव्हल या प्रकारातील आहेत. या पार्श्‍वभूमिवर पॅरटने आता व्यावसायिक ड्रोन उत्पादनात पदार्पण केले आहे. या अनुषंगाने दोन नवीन ड्रोन सादर करण्यात आले आहे. यात बेपॉप-प्रो थर्मल आणि पॅरट ब्ल्यूग्रास या मॉडेल्सचा समावेश आहे. यातील पहिल्या मॉडेलचा प्रामुख्याने रेस्क्यू ऑपरेशन्ससारख्या आपत्कालीन स्थितीत उपयोग होणार आहे. यात नियमित कॅमेर्‍यासोबत थर्मल कॅमेर्‍याचा पर्यायदेखील देण्यात आला आहे. यामुळे कोणत्याही दुर्घटनेत बचाव दलास अचूक मदत करण्यासाठी हे ड्रोन उपयुक्त ठरणार आहे. यातील थर्मल कॅमेर्‍यामुळे आगीसारख्या दुर्घटनेत नेमके कोणत्या भागात किती तापमान आहे? याची अचूक माहिती मिळू शकेल. ही सर्व माहिती स्ट्रीमिंगच्या माध्यमातून मिळवून बचाव दल काम करू शकते. तर पॅरट ब्ल्यूग्रास या मॉडेलमध्ये इनबिल्ट सेन्सरच्या मदतीने शेतीची पाहणी करण्याची प्रणाली देण्यात आली आहे. याच्या मदतीने कोणत्याही पीकाच्या अचूक स्थितीबाबत माहिती मिळणार आहे. हे ड्रोन एकदा चार्ज केल्यानंतर २५ मिनिटांपर्यंत उडू शकते.

पॅरट बेपॉप-प्रो थर्मल हे ड्रोन १५०० डॉलर्समध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर पॅरट ब्ल्यूग्रास ड्रोन ५,००० डॉलर्स मूल्यात बाजारपेठेत उतारण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here