पोर्ट्रानिक्सचा मफ्स आर वायरलेस हेडफोन दाखल

0

पोर्ट्रानिक्स कंपनीने मफ्स आर हा नवीन वायरलेस हेडफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.

पोर्ट्रानिक्सने आधीही मफ्स या मालिकेत काही मॉडेल्स सादर केले आहेत. यात आता मफ्स आर या नवीन हेडफोनची भर पडली आहे. वर नमूद केल्यानुसार हे मॉडेल वायरलेस या प्रकारातील आहे. यासाठी यामध्ये ब्ल्यु-टुथ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. याच्या मदतीने हा हेडफोन स्मार्टफोनसह अन्य स्मार्ट उपकरणांना कनेक्ट करता येणार आहे. याची रेंज सुमारे १० मीटरपर्यंत असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. हे मॉडेल वजनाने अतिशय हलके असून याची डिझाईन ही कानांसाठी सुखदायी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. याला फोल्ड करता येणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात ऑक्झ-इन पोर्टदेखील दिलेले आहे. यामुळे याला वायर्ड हेडफोन म्हणूनदेखील वापरता येणार आहे.

यामध्ये इनबिल्ट मायक्रोफोन देण्यात आलेला आहे. याच्या मदतीने कुणीही याच्याशी संलग्न असणार्‍या स्मार्टफोनवरील कॉल रिसीव्ह करू शकतो. यात अतिशय दर्जेदार बॅटरी दिलेली आहे. ती एकदा चार्ज केल्यानंतर १० ते १५ तासांपर्यंतचा बॅकअप देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा वायरलेस हेडफोन ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आला असून याचे मूल्य ३,९९९ रूपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here