प्राईम डे साठी अ‍ॅमेझॉन लाँचपॅडतर्फे २५ खास उत्पादने

0
अमेझॉन प्राईम डे, amazon prime day

अमेझॉनने आपल्या आगामी प्राईम डे साठी खास नवीन २५ उत्पादने लाँच करण्याची घोषणा केली असून याला ग्रााहकांना किफायतशीर मूल्यात सादर करण्यात आले आहे.

अमेझॉनचा प्राईम डे हा अ‍ॅमेझॉनचा वार्षिक शॉपिंग महोत्सव भारतासह १७ देशांमधील १०० दशलक्षहून अधिक प्राईम सदस्य साजरा करणार आहेत. हा महोत्सव १६ ते १७ जुलै २०१८ दरम्यान सुरू राहणार आहे. हा बहुप्रतिक्षित महोत्सव असून गेल्या वर्षीपेक्षा यंदा हा महोत्सव अधिकच मोठा बनला आहे. भारतात या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. प्राईम डे अ‍ॅमेझॉन लाँचपॅडमधील स्टार्ट-अप्सना त्यांच्या उत्पादनांची नवीन रेंज देशभरातील प्राईम सदस्यांना दाखवण्याची संधी देत आहे. या रेंजमध्ये आरोग्यदायी फूड उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स, सामान व बॅकपॅक्स, हेल्थ व पर्सनल केअर, घरगुती सजावट व सुधारणा, कॉफी व पेये आणि खेळणी व गेम्स अशा विविध विभागांमधील उत्तम व नाविन्यपूर्ण उत्पादनांचा समावेश असेल. सोबतच आकर्षक डिल्स व ऑफर्स देखील असतील. यंदाच्या प्राईम डे मध्ये ग्राहकांसाठी उत्पादनांची रेंज वाढवणारे अ‍ॅमेझॉन लाँचपॅड हे स्टार्ट-अप्सच्या अद्वितीय व सर्जनशील उत्पादनांचा शोध घेण्याचे गंतव्य स्थान आहे. ही उत्पादने पुढीलप्रमाणे आहेत.

गॅझेट प्रेमींसाठी, लीफ वीअरेबल्स, एलकेअर, टॅग व १मोरने अनेक हेडफोन्स व इअरफोन्स सादर केले आहेत. कारमध्ये कनेक्टीव्हीटीची उत्तम सेवा देण्यासाठी ऑटोविझ ऑटोविझ हॉटस्पॉट हे कनेक्टेड कार सोल्यूशन सादर करण्यात आले आहे. हे सोल्यूशन कोणत्याही कारला ४जी स्पीड वाय-फाय हॉटस्पॉटमध्ये बदलू शकते. रोडगॉड्स २ नवीन बॅकपॅक्स सादर करत आहे . भारतात पहिल्यांदाच पिकाव्यूने डिजिटल फोटो फ्रेम्स डिझाइन केल्या आहेत. या फ्रेम्समध्ये फुल एचडी आयपीएस डिस्प्लेसह एचडीएमआय आहे. या फ्रेम्समध्ये फोटोशॉप व वुडन फ्रेम, आयपीएस हाय रिझॉल्युशन, व्यापक १६: डिस्प्ले, मोशन सेन्सर अशी वैशिष्ट्ये आहेत. मोशन सेन्सर खोलीमध्ये एखादी व्यक्ती आल्यास फ्रेम चालू करते आणि खोलीमधून एखादी व्यक्ती बाहेर गेल्यास फ्रेम बंद करते. ही फ्रेम वीजेची बचत करण्यामध्ये देखील मदत करते. यामध्ये रिमोट कंट्रोल, अलार्म क्लॉक, कॅलेंडर फंक्शनस व स्टिरिओ स्पीकरर्स ही वैशिष्ट्ये देखील आहेत. मुलांसाठी खेळणी व गेम्स स्टार्ट-अप स्मार्टीव्हीटी लॅब्स एसटीईएम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) डीआयवाय (डू-इट-युअरसेल्फ) टॉईज सादर होणार आहे.

अ‍ॅमेझॉनचा महोत्सव १६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता सुरू होऊन १७ जुलै मध्यरात्रीपर्यंत सुरू राहील. प्राईम डे हा खास ३६-तासांचा महोत्सव आहे. हा महोत्सव प्राईम सदस्यांना विशेष सादरीकरणे, सर्वोत्तम डील्स व मनोरंजनपूर्ण प्रिमिअर्सची सुविधा देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here