प्लेस्टेशनवर येणार पबजी गेम : जाणून घ्या संपूर्ण माहिती

0
पबजी गेम, pubg game

तुफान लोकप्रिय झालेला पबजी गेम आता प्लेस्टेशन-४ या गेमींग कन्सोलवर दाखल होणार असून याची अगावू नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

प्लेअर अननोन्स बॅटलग्राऊंडस् म्हणजेच पबजी गेमने जगभरात धमाल केली आहे. पोकेमॉन गो या गेमनंतर एखाद्या गेमला पहिल्यांदाच इतक्या प्रमाणात हाईप मिळाल्याचे सर्व जण अनुभवत आहेत. अगदी मेट्रो शहरांपासून ते खेडोपाडीच्या तरूणाईला पबजी गेमने वेड लावले आहे. तर याच पबजी शौकिनांसाठी आता खुशखबर आहे. हा गेम आता पीएस-४ अर्थात प्लेस्टेशन-४ या गेमींग कन्सोलवर दाखल होणार आहे. येत्या ७ डिसेंबरपासून ग्राहक याला प्रत्यक्षात खरेदी करू शकतील. तथापि, याआधीच याची अगावू नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

प्लेस्टेशनच्या भारतीय संकेतस्थळावरून पबजी गेमची विक्रीपूर्व नोंदणी सुरू करण्यात आली आहे. हा गेम लुटर्स एडिशन, सर्व्हायव्हर्स एडिशन आणि चँपियन्स एडिशन या तीन आवृत्त्यांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. यांचे मूल्य अनुक्रमे २,७५०; २,७५० आणि ३,९९९ रूपये इतके ठेवण्यात आलेले आहे. यातील लुटर्स एडिशनमध्ये बेस गेम आणि एक्सक्लुझीव्ह पीएस-४ स्कीन्स देण्यात आल्या आहेत. सर्व्हायव्हर्स एडिशनमध्ये बेस गेम, विकेंडी इव्हेंट पास, २,३०० जी-कॉईन्स, २०,००० बीपी आणि एक्सक्लुझीव्ह पीएस-४ स्कीन्स मिळणार आहे. तर चँपीयन्स एडिशनमध्ये विकेंडी इव्हेंट पास, ६,००० जी-कॉईन्स, २०,००० बीपी आणि एक्सक्लुझीव्ह पीएस-४ स्कीन्स देण्यात येतील. पीएस-४ कन्सोलसाठी सादर करण्यात येणारा पबजी गेम हा डिस्कच्या स्वरूपात की डिजीटल डाऊनलोडच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येईल याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, याचा प्लेस्टेशन आणि पबजी या दोन्हींना खूप लाभ होणार असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here