फिल कंपनीचे प्रिमीयम हेडफोन्स

0

फिल या चीनी कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी फिल वायरलेस हेडफोन्स हे मॉडेल १७,४९९ रूपये मूल्यात सादर करण्याची घोषणा केली आहे.

फिल वायरलेस हेडफोन्स या मॉडेलमध्ये नॉइस कॅन्सलेशन हे फिचर देण्यात आले आहे. यामुळे बाहेरीला आवाजाचा व्यत्यय न येता संगीताचा पूर्ण आनंद घेता येतो. याचे इयरकप हे अतिशय उत्तम दर्जाचे असून याला अ‍ॅडजस्ट करता येणारे डिझाईन प्रदान करण्यात आले आहे. यात अतिशय उत्तम दर्जाची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ३३ तासांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यामध्ये एपीटीएक्स आणि एएसी हे ऑडिओ कोडेक्स देण्यात आले आहेत. याला हाय फिडॅलिटी डिजीटल साऊंड प्रोसेसरची जोडदेखील देण्यात आलेली आहे. ब्ल्यु-टुथच्या मदतीने हे हेडफोन्स स्मार्टफोनसह अन्य उपकरणांना कनेक्ट करता येतात. या माध्यमातून एकाच वेळी ८ उपकरणांना हे मॉडेल कनेक्ट करणे शक्य आहे. या मॉडेलसाठी कंपनीने फिल + या नावाने स्वतंत्र स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशन सादर केले असून ते अँड्रॉइड व आयओएस या प्रणालींसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. हे हेडफोन्स एक वर्षाच्या वॉरंटीसह ग्राहकांना सादर करण्यात आले असून हे मॉडेल अमेझॉन इंडिया आणि पेटीएमवरून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here