फुजीफिल्म एक्स-टी१०० मॉडेलचे अनावरण

0

फुजीफिल्म कंपनीने एक्स-टी१०० हा मिररलेस कॅमेरा बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

फुजीफिल्म एक्स-टी१०० मध्ये ब्ल्यु-टुथ व वाय-फाय कनेक्टीव्हिटी देण्यात आली आहे. यामुळे याला स्मार्टफोनसोबत कनेक्ट करता येणार आहे. यासाठी स्वतंत्र स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशनदेखील विकसित करण्यात आले आहे. याशिवाय यात युएसबी, मायक्रो-युएसबी, एचडीएमआय आदी पर्यायदेखील असतील. यातील बॅटरी दर्जेदार असून ती एकदा चार्ज केल्यानंतर ४३० प्रतिमा काढता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यातील सेन्सर हे
२४ मेगापिक्सल्स क्षमतेचे एपीएस-सी सीएमओएस या प्रकारातील असेल. यामध्ये ९१ पॉइंटरवर आधारित फेज डिटेक्शन ऑटो-फोकस (पीडीएएफ) प्रणाली दिलेली आहे. यातील आयएसओ रेंज ही २००-१२८०० असून ती १००-५१२०० पर्यंत विस्तारीत करणे शक्य आहे. या कॅमेर्‍यात ३ इंच आकारमानाचा टचस्क्रीन एलसीडी डिस्प्ले देण्यात आलेला असून हा डिस्प्ले तीन प्रकारांमध्ये वळवून वापरण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. अर्थात याच्या मदतीने सेल्फीसमान प्रतिमा सहजपणे घेता येणार आहेत. तसेच यातील इलेक्टॉनिक व्ह्यू फाईंडर हा अतिशय दर्जेदार असा आहे.

फुजीफिल्म एक्स-टी१०० या मॉडेलमध्ये १५ फ्रेम्स प्रति-सेकंद या गतीने फोर-के (३८४० बाय २१६० पिक्सल्स ) क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण शक्य आहे. तसेच यात ६० फ्रेम्स प्रति-सेकंदाच्या गतीने फुल एचडी व्हिडीओ रेकॉर्डींग आणि सुपर स्लो-मोशनमधील चित्रीकरणदेखील करता येणार आहे. पहिल्यांदा हे मॉडेल अमेरिका व कॅनडामध्ये मिळणार असून लवकरच याला भारतात लाँच करण्यात येईल असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here