‘फेसबक लाईव्ह’वर आता फिल्टर्स

0
Facebook

फेसबुकच्या लाईव्ह स्ट्रिमिंगमध्ये आता स्नॅपचॅटप्रमाणे कुणीही आपल्या चेहर्‍यांवर आकर्षक फिल्टर्स लाऊ शकणार आहे.

फेसबुकने आपली लाईव्ह स्ट्रिमिंग सेवा लोकप्रिय करण्यासाठी हालचाली गतीमान केल्या आहेत. अलीकडेच फेसबुकने काही सेलब्रिटीज आणि मीडिया हाऊसेसशी या संदर्भात केलेले करार हे लक्षणीय मानले जात आहेत. यातच आता लाईव्ह स्ट्रिमिंग अधिक आकर्षक होण्यासाठी फिल्टर्सची सुविधा दिलेली आहे. यात कुणीही स्ट्रिमिंग करतांना आपल्या चेहर्‍यावर आकर्षक मुखवटे लाऊ शकणार आहेत. स्नॅपचॅटमध्ये हे फिचर आधीपासून आहे. अर्थात स्नॅपचॅटच्या लोकप्रियतेला टक्कर देण्यासाठी फेसबुकने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here