फेसबुकवरून मिळणार नोकर्‍या

0
Facebook

फेसबुकने आता आपल्या पेजेसवरून नोकरींच्या जाहिराती देण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे संकेत दिले आहेत.

फेसबुकने आता ‘लिंक्ड-इन’ या प्रोफेशनल नेटवर्कला टक्कर देण्यासाठी जॉब प्लेसमेंटसारख्या फिचरची चाचणी सुरू केली आहे. या अंतर्गत आता विविध कंपन्या आपल्या फेसबुक पेजवरून नोकर्‍यांच्या जाहिराती देऊ शकतील. याचसोबत या कंपन्या आपल्या पेजवरूनच इच्छुकांचे आवेदन स्वीकारू शकणार आहेत. या आवेदनपत्रात उमेदवार आपली शैक्षणिक पात्रता, अनुभव, अतिरिक्त कौशल्य, वेतनाची अपेक्षा आदींबाबत माहिती भरून ती संबंधीत कंपनीकडे थेट पाठवू शकेल. या माध्यमातून लहान आणि मध्यम आकारमानाच्या कंपन्यांना लाभ होणार असल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here