फेसबुकवर कि-वर्ड खुबीने दडविण्याची सुविधा

0
फेसबुक कि-वर्ड, facebook keyword snooz

एखादा कि-वर्ड ३० दिवसांसाठी लॉक करण्याची सुविधा फेसबुकने जाहीर केली असून या माध्यमातून प्रत्येक युजरला त्याच्या टाईमलाईनवर नियंत्रणासाठी एक महत्वाचे टुल प्रदान केले आहे.

एखादा कि-वर्ड ब्लॉक करण्याची सुविधा असणारे फिचर हे आता काही युजर्सला दिसू लागले आहे. याआधी या प्रकारची सुविधा ट्विटरने प्रदान केली आहे. तर अलीकडेच इन्स्टाग्रामनेही कोणत्याही कॉमेंटवरील अन्य प्रतिक्रियेला दडविण्याचे फिचर दिले आहे. फेसबुकने आधीच एखादा युजर, पेज अथवा ग्रुपला तात्पुरते अनफॉलो करण्याचे फिचर दिले आहे. आता याचीच पुढील आवृत्ती कि-वर्ड स्नुझ या फिचरच्या माध्यमातून समोर आली आहे. याबाबत फेसबुकने एका पोस्टच्या माध्यमातून अधिकृत घोषणा केली आहे. याच्या अंतर्गत एखाद्या शब्दाशी संबंधीत पोस्ट, प्रतिमा अथवा व्हिडीओजला संबंधीत युजर आपल्या टाईमलाईनवर दिसण्यापासून मज्जाव करू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या युजरला मांसाहार आवडत नाही. आणि त्याला आपल्या टाईमलाईनवर अन्य युजर्सने याबाबत केलेल्या पोस्टदेखील पहावयाच्या नाहीत. यासाठी तो मांसाहार या शब्दाशी संबंधीत सर्व पोस्ट स्नूझ करू शकतो. यासाठी युजराला आपल्या टाईमलाईनच्या वरील उजव्या बाजूस क्लिक करावे लागणार आहे. येथे क्लिक करून तो युजर मांसाहार हा कि-वर्ड टाईप करून याला लॉक करू शकतो. यानंतर संबंधीत युजरला मांसाहाराशी संबंधीत पोस्ट ३० दिवसांपर्यंत दिसणार नाही. अर्थात संबंधीत युजरला इतरांना कळू न देता आपल्या टाईमलाईनवरून मांसाहाराशी संबंधीत पोस्ट हटविता येणार आहे. हे फिचर वैयक्तीक प्रोफाईलसह पेजेस आणि ग्रुप्सलाही लागू असेल असे फेसबुकने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

फेसबुकने आपल्या युजर्सला त्याच्या टाईमलाईनवर पुरेपूर नियंत्रण असावे या दृष्टीने अनेक सुविधा आधीच प्रदान केल्या आहेत. यामध्ये सी-फर्स्ट, हाईड, अनफॉलो आणि स्नूझ या फिचर्सचा समावेश आहे. यामध्ये आता कि-वर्ड स्नूझचा समावेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही सुविधा संगणकासह अँड्रॉइड व आयओएस या प्रणालींच्या युजर्सला क्रमाक्रमाने देण्यास प्रारंभ झाला आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here