फेसबुकवर मॅसेंजरवर फोटो मॅजिक

0

फेसबुकने आपल्या मॅसेंजरवर युजरच्या कॅमेर्‍यातल्या त्याच्या फ्रेंडस्चे फोटो अपलोड करण्याची सुविधा देणारे फोटो मॅजिक हे नवीन फिचर सादर केले आहे.

सध्या ऑस्ट्रेलियातील स्मार्टफोन युजर्सच्या माध्यमातून या फिचरची चाचणी सुरू आहे. यात ‘फेस रिकग्निशन’ हे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यात संबंधीत स्मार्टफोन युजरने आपल्या कॅमेर्‍यातून छायाचित्र घेतल्यानंतर त्याला स्कॅन करण्यात येते. ‘फेस रिकग्निशन’च्या माध्यमातून त्या छायाचित्रात संबंधीत युजरचे कुणी फेसबुक फ्रेंड असल्यास त्याला हा फोटो मॅसेंजरच्या माध्यमातून पाठविण्याचे सुचविण्यात येते. याला फोटो मॅजिक हे नाव देण्यात आले आहे.

फेसबुकने आधीच आपल्या युजर्सला कॅमेर्‍यातील छायाचित्रे अपलोड करण्याची सुविधा दिली आहे. मात्र ही नवीन सुविधा अत्यंत प्रगत आणि उपयुक्त ठरणारी आहे. फेसबुकने आपले मॅसेंजर हे स्वतंत्र ऍप सादर केल्यानंतर ते एक अब्जांपेक्षा जास्त स्मार्टफोनधारकांनी डाऊनलोड केले आहे. मॅसेंजरवर मोठ्या प्रमाणात छायाचित्रांची देवाणघेवाण होत असते. या पार्श्‍वभुमिवर फोटो मॅजिक ही सुविधा युजर्सच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here