फेसबुकवर 360 अंशातील व्हिडीओचे लाईव्ह प्रक्षेपण

0

फेसबुकने आता आपल्या सर्व युजर्सला 360 अंशातील व्हिडीओजचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याची सुविधा दिली आहे.

फेसबुकवर सध्या कुणीही युजर आपल्या टाईमलाईनवर 360 अंशातील छायाचित्रे शेअर करू शकतो. तर निवडक युजर्सला 360 अंशातील व्हिडीओजचे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याची सुविधा दिली आहे. आता या सेवेचा विस्तार करत सर्व युजर्सला ही सुविधा वापरता येणार आहे. फेसबुकच्या लाईव्ह व्हिडीओ स्ट्रीमिंगप्रमाणेच याचा वापर करता येईल. यासाठी फेसबुकने 360 अंशात व्हिडीओचे चित्रीकरण करण्यास सक्षम असणार्‍या कॅमेर्‍यांचा सपोर्टदेखील प्रदान केला आहे. यात अगदी अलीकडेच सॅमसंगने लाँच केलेल्या नवीन गिअर 360 या कॅमेर्‍याचाही समावेश आहे. भविष्यात 360 अंशातील प्रतिमा आणि व्हिडीओज मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतील असे मानले जात आहे. या पार्श्‍वभूमिवर फेसबुकचे हे फिचर युजर्सला अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here