फेसबुक बंद झाले अन्…

0
(मुख्य अ‍ॅपवरील लोगो हा आधीचाच राहणार आहे.)

दोन महिन्यात दुसर्‍यांदा फेसबुक तब्बल अर्ध्या तासापर्यंत बंद झाल्यानंतर सायबरविश्‍वात चांगलीच धांदल उडाली. काहींनी यासाठी पोलिसांकडे तक्रार केली तर बर्‍याच नेटकर्‍यांनी यावरून फेसबुकची चांगलीच खिल्ली उडविली.

facebook

कोणत्याही वेबसाईटच्या यशाचे रहस्य तिच्या नियमितपणे चालण्यातच असते. आघाडीच्या वेबसाईट तर याबाबत खूपच सजग असतात. मात्र असे असूनही बर्‍याच लोकप्रिय साईट काही वेळेपुरत्या बंद होत असतात. अगदी गुगलसारख्या प्रथम क्रमांकाच्या संकेतस्थळालाही अशी अडचण येते. याचप्रकारे फेसबुक जुन महिन्यात एक तासासाठी ‘डाऊन’ झाले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. नेमकी अशीच स्थिती शुक्रवारी फेसबुक बंद पडल्यामुळे झाली.

फेसबुक जवळपास अर्ध्या तासासाठी बंद पडले. यात १९ मिनिटे तर युजर्सला ‘एरर’चा मॅसेज येत होता. फेसबुक प्रत्येक मिनिटाला सुमारे २३ हजार डॉलर्सची कमाई करते. यामुळे या बंदमुळे तब्बल पाच लाख डॉलर्सचा त्यांना फटका बसला. मात्र यावरून फेसबुकच्या वापरकर्त्यांची चांगलीच धांदल उडाली. अनेक अमेरिकन वापरकर्त्यांनी फेसबुक बंद पडल्यानंतर पोलिसांना कॉल केला. यामुळे विशेषत: लॉस एंजल्स येथील पोलिसांकडे इतके कॉल आले की, पोलिसांना आपल्या ट्विटर अकाऊंटवरून फेसबुक बंद पडणे हा मुद्दा कायदा व सुव्यवस्थेशी संबंधीत नसल्याने याबाबत आमच्याकडे विचारणा करू नये असे जाहीर केले. दरम्यान, फेसबुक बंद पडल्याने ट्विटरवर याबाबत जोरदार चर्चा झडली. बंद पडलेले फेसबुक हा ट्विटरवर ट्रेंड बनला. या प्रकरणावरून अनेक युजर्सनी फेसबुकच्या टेक्नीकल टीमवर तिरकस शैलीत टीका केली. वेब सरफेस आणि एपीआयमध्ये अडचण आल्यामुळे आपली सेवा काही काळ खंडित झाल्याचे फेसबुकने मान्य केले. अर्थात या प्रकारामुळे फेसबुकची काही प्रमाणात तरी नाचक्की झालीच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here