फेसबुक मॅसेंजरचे एक अब्जावर युजर्स

0
facebook-messenger

फेसबुक मॅसेंजरने एक अब्ज युजर्सचा अत्यंत महत्वाचा टप्पा पार केला आहे. स्वतंत्र अ‍ॅप झाल्यापासून दोन वर्षात मॅसेंजरने ही कामगिरी केली आहे.

२०१४च्या प्रारंभी फेसबुकने आपल्या मॅसेंजरला स्वतंत्र अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या युजर्ससाठी लाँच केले. फेसबुकचा वापर करावयाचा असेल तर मॅसेंजरचे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल अशी सक्तीदेखील करण्यात आली. याचा अतिशय उत्तम परिणाम झाला आणि लवकरच हे अ‍ॅप लोकप्रिय झाले. आता या अ‍ॅपचे एक अब्ज डाऊनलोड पुर्ण झाले आहेत. फेसबुकसह या कंपनीचीच मालकी असणार्‍या व्हाटसअ‍ॅपने आधीच एक अब्ज युजर्स मिळवले आहेत. या पार्श्‍वभुमिवर मॅसेंजरचे हे यश लक्षणीय असेच आहे. या वर्षाच्या एप्रिल महिन्यातच मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक मॅसेंजर हे थर्ड पार्टी डेव्हलपर्ससाठी खुले करण्याची घोषणा केली होती. यामुळे मॅसेंजरचा एपीआय वापरून कुणालाही अ‍ॅप वा चॅटबॉट तयार करणे शक्य झाले. याचमुळे अवघ्या तीन महिन्यातच ११ हजारांवर ‘बॉट’ तयार करण्यात आले असून भविष्यात हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. यावर अगदी कॅब तसेच विविध कार्यक्रमांची बुकींग करण्यापासून ते आपले नित्यनेमाचे व्यवहार होण्याची शक्यतादेखील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here