फेसबुक मॅसेंजरचे ८० कोटी युजर्स

0

फेसबुक मॅसेंजरचे ८० कोटी युजर्सचा महत्वाचा टप्पा पार केल्याची अधिकृत माहिती आता जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या वर्षाच्या सुरवातीला फेसबुक कंपनीने आपल्या मुख्य ऍपपासून मॅसेंजरला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला होता. अर्थात प्रत्येक फेसबुक युजरला मॅसेंजर ऍप डाऊनलोड करणे अनिवार्य करण्यात आले होते. प्रारंभी याचा नकारात्मक परिणाम होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले होते. मात्र अल्पावधीतच बहुतांश फेसबुक युजर्सनी याला डाऊनलोड केल्यामुळे आता मॅसेंजरचे युजर्स ८० कोटी झाले आहेत. अमेरिकेत २०१५ या वर्षात सर्वात जास्त वेगाने डाऊनलोड करण्यात आलेल्या ऍपमध्ये याला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

गत मार्च महिन्यात ‘मॅसेंजर प्लॅटफॉर्म’ या नावाने याला डेव्हलपर्सला सादर करण्यात आले होते. अर्थात कुणीही डेव्हलपर यापासून ‘थर्ड पार्टी’ ऍप तयार करू शकतो. याचा अत्यंत अनुकुल परिणाम झाला. यानंतर यात ‘एम’ हा व्हर्च्युअल असिस्टंट देण्यात आला. तसेच यातून होणारे संभाषण अधिक आकर्षक करण्यासाठी वाढीव इमोजी, व्हिडीओ कॉलिंग आदी सुविधादेखील प्रदान करण्यात आल्या. तर डिसेंबर महिन्यात उबेर या ऑन डिमांड टॅक्सी सर्व्हीसशी करार करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून अमेरिकेत कुणीही फेसबुक मॅसेंजर वापरून टॅक्सी बोलवू शकतो. आता फेसबुक मॅसेंजर एक अब्ज युजर्सच्या दिशेने गतीमान झाल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here