फेसबुक मॅसेंजरवर येणार अनसेंड फिचर

0
facebook-messenger

फेसबुक मॅसेंजरवर लवकरच अनसेंड फिचर येणार असून याच्या माध्यमातून युजर आपल्यासह समोरील व्यक्तीच्या इनबॉक्समध्ये पाठविलेला संदेश डिलीट करू शकणार आहे.

सध्या फेसबुकची मालकी असणार्‍या इन्स्टाग्राम आणि व्हाटसअ‍ॅपच्या युजर्ससाठी अनसेंड हे फिचर देण्यात आलेले आहे. विशेष करून व्हाटसअ‍ॅपवर तर या फिचरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असतो. या पार्श्‍वभूमिवर, लवकरच फेसबुक मॅसेंजरवरही याच प्रमाणातील फिचर येणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. ख्यातप्राप्त टिपस्टार जेन वाँचुन वाँग या तंत्रज्ञाने याबाबतची माहिती दिली आहे. त्याने फेसबुक मॅसेंजरच्या अँड्रॉइड प्रणालीसाठी असणार्‍या अ‍ॅपच्या सोर्स कोडमधून याची माहिती मिळवली. त्याने स्क्रीनशॉटसह याबाबतचे सविस्तर विवरण जाहीर केले आहे. यानुसार सध्या हे फिचर प्रयोगात्मक अवस्थेत देण्यात आलेले आहे. येत्या काही महिन्यांमध्ये याला अपडेटच्या स्वरूपात लाँच करण्यात येणार आहे. पहिल्यांदा याला अँड्रॉइड युजर्ससाठी सादर करण्यात येणार असून लवकरच आयओएस आणि वेब आवृत्तीला देण्यात येईल अशी माहिती त्याने दिली आहे. दरम्यान, त्याने केलेल्या दाव्याला फेसबुकच्या प्रवक्त्याने दुजोरादेखील दिला आहे.

फेसबुक मॅसेंजरवरील अनसेंड फिचरच्या माध्यमातून कोणताही युजर हा त्याने समोरच्या व्यक्तीला पाठविलेला मॅसेज स्वत:सह त्या व्यक्तीच्या इनबॉक्समधून डिलीट करू शकणार आहे. व्हाटसअ‍ॅपच्या फिचरमध्ये असणार्‍या कालमर्यादेप्रमाणे या फिचरलाही टाईम लिमीट असणार आहे. मात्र ही मर्यादा नेमकी किती असेल? याची माहिती अद्याप दिलेली नाही. विशेष बाब म्हणजे फेसबुकने सुमारे सहा महिन्यांपूर्वीच मॅसेंजरवर अनसेंड फिचर येणार असल्याचे सूतोवाच केले होते. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये याला कार्यान्वित करण्यात येईल हे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here