फेसबुक लाईक बनले अधिक रंगतदार !

0

फेसबुकने आधी जाहीर केलेले रिऍक्शन हे फिचर आजपासून जगभरात सादर करण्यात आले असून यात ‘लाईक’चा विस्तार करण्यात आला आहे.

फेसबुकने ‘लाईक’चा विस्तार करण्याची खूप आधीपासून योजना तयार केली होती. मध्यंतरी याला पर्याय म्हणून ‘डिसलाईक’ हे बटन येणार असल्याचीदेखील चर्चा होती. मात्र खुद्द मार्क झुकरबर्ग यांनी या नकारात्मकतेला जाहीररित्या नकार दिला होता. याप्रसंगी त्यांनी ‘डिसलाईक’ ऐवजी ‘रिऍक्शन’ हे फिचर देण्यात येईल अशी घोषणा केली होती. अलीकडेच या विस्तारात नेमके काय असेल? याबाबत बरेच दावे-प्रतिदावे करण्यात आले होते. याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचल्यानंतर आज फेसबुकने हे फिचर अधिकृतरित्या सादर करत असल्याची घोषणा केली आहे.

यानुसार आता फेसबुकवरील कोणत्याही पोस्टच्या ‘लाईक’ या बटनवर क्लिक केल्यानंतर लाईकच्या अंगठ्यासह अन्य पाच इमोजी आपल्यासमोर येतील. यात लव्ह, हाहा, वॉव, सॅड आणि अँग्री या इमोजींचा समावेश आहे. अर्थात एखादी पोस्ट फक्त अंगठा उचकावत ‘लाईक’ करण्यासोबत आता प्रेम, विनोद, उत्स्फुर्तता, दु:खी आणि संतापी या पाच भावना व्यक्त करता येणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये डेस्कटॉप आणि सर्व ऑपरेटींग प्रणालीवरील युजर्सला हे अपडेट टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here