फेसबुक व्हिडीओवर ‘वॉच लेटर’ !

0

फेसबुक या सोशल साईटवरील व्हिडीओसाठी आता ‘वॉच लेटर’ हा पर्याय उपलब्ध करण्याची चाचपणी सुरू झाली आहे. या स्वरूपाची युट्युबवर सुविधा होती.

facebook_watch_later

युट्युब आणि फेसबुक यांच्यातील स्पर्धा आता अत्यंत चुरशीची बनली आहे. गेल्या काही महिन्यांपासून फेसबुक आपल्या वापरकर्त्यांना व्हिडीओ उत्तम पध्दतीने पाहण्यासाठी नवनवीन सुविधा प्रदान करतांना दिसत आहे. प्रारंभी व्हिडीओ ‘एंबीड’ करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली होती. यानंतर गेल्याच आठवड्यात फेसबुक साईटवर फ्लोटींग व्हिडीओ दिसू लागले असल्याचे वृत्त ‘टेकक्रंच’ या टेक पोर्टलने दिले आहे. आता काही वापरकर्त्यांना व्हिडीओवर ‘वॉच लेटर’ हा पर्याय दिसू लागला आहे. यावर क्लिक केल्यानंतर त्या व्हिडीओचे युआरएल ‘सेव्ह’ होते. यानंतर एका स्वतंत्र भागात या व्हिडीओच्या लिंक दिसतात. एका अर्थाने हा व्हिडीओ बुकमार्क करण्याचा प्रकार आहे. याआधी ही सुुविधा होती. याचाच कित्ता फेसबुक साईटने गिरवला आहे.

सद्यस्थितीत फेसबुक साईटवर दिवसाला तब्बल चार अब्ज व्हिडीओज पाहिले जातात. ‘वॉच लेटर’ या पर्यायामुळे यात काही प्रमाणात तरी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here