फ्लिपकार्टवरून मिळणार शाओमी मी मिक्स २

0

शाओमी कंपनीने आपला मी मिक्स २ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच केला असून हे मॉडेल फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवरून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

शाओमी मी मिक्स २ स्मार्टफोनमध्ये ५.९९ इंच आकारमानाचा आणि २१६० बाय १०८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा आणि १८:९ गुणोत्तर असणारा सुपर अमोलेड फुल स्क्रीन डिस्प्ले असेल. ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर यात देण्यात आला आहे. शाओमी मी मिक्स २ मधील मागच्या बाजूला १२ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे असतील. तर यात ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. यात फोरजी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, जीपीएस, फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्स असतील. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट ७.१ या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा मीआययुआय ९ हा युजर इंटरफेस असेल. क्विकचार्ज ३.० तंत्रज्ञानासह यात ३४०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी मी मिक्स २ हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात चीनी बाजारपेठेत लाँच करण्यात आले होते. यानंतर शाओमी कंपनीने हे मॉडेल लवकरच भारतीय ग्राहकांना मिळणार असल्याचे जाहीर केले होते. यानुसार दिवाळीच्या पार्श्‍वभूमिवर हा फ्लॅगशीप स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. शाओमी मी मिक्स २ हे मॉडेल सहा जीबी रॅम आणि ६४, १२८ आणि २५६ जीबी स्टोअरेजच्या तीन पर्यायांमध्ये जाहीर करण्यात आले होते. यातील ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असणारे व्हेरियंट भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. याचे मूल्य ३५,९९९ रूपये आहे. पहिला फ्लॅश सेल १७ ऑक्टोबरला असून ग्राहकांना हे मॉडेल फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here