फ्लिपकार्टवर अ‍ॅपल वीक सेल सुरू

0

फ्लिकपार्ट या शॉपींग पोर्टलवर सध्या अ‍ॅपल वीक अंतर्गत सेल सुरू असून यात या कंपनीच्या विविध प्रॉडक्टवर आकर्षक सवलती देण्यात येत आहेत.

फ्लिपकार्टवर अ‍ॅपल वीक अंतर्गत सेल सुरू झाला असून तो २७ मे पर्यंत चालू राहणार आहे. यामध्ये आयफोन एक्स हे मूळ ८९,००० रूपये मूल्य असणारे मॉडेल ८५ हजारात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस हे दोन्ही मॉडेल्स ग्राहकांना ६२,९९९ रूपये मूल्यात अर्थात मूळ किंमतीपेक्षा ५ हजारांनी कमीत मिळत आहेत. आयफोन ६ एस (३२ जीबी) हे मॉडेल ३२,९९९ रूपये; आयफोन ७ (३२ जीबी) हे ४६,९९९ रूपये आणि आयफोन एसई हे मॉडेल १७,९९९ रूपयात उपलब्ध करण्यात आले आहे.

फ्लिपकार्टवरील अ‍ॅपल वीकमध्ये या कंपनीच्या अन्य उत्पादनांवरही सवलत मिळत आहे. यामध्ये आयपॅड-२०१७ (वाय-फाय ३२ जीबी स्टोअरेज) हे मॉडेल २२,९९० रूपयात मिळत आहे. अ‍ॅपल वॉच सेरीज वनचे मूल्य २२,९०० तर सेरीज-३ जे मूल्य २९,९०० रूपयांपासून सुरू होत आहे. अ‍ॅपल मॅकबुक एयर हे मॉडेल ५५,९९० रूपयात तर अ‍ॅपल एयरपॉड १८९९ रूपयात मिळत आहेत. अ‍ॅपल टिव्ही (३२ जीबी) हे मॉडेल १४,६९८ रूपयात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. तर या सेलमध्ये निवडक प्रॉडक्टवर आयसीआयसीआयच्या कार्डवरून खरेदी करतांना १० टक्के इतका कॅशबॅक मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here