बंद पडणार याहू मॅसेंजर !

0

याहू कंपनीने गत १८ वर्षांपासून कार्यरत असणारा याहू मॅसेंजर बंद करण्याची घोषणा केली आहे. ५ ऑगस्टपासून हा मॅसेंजर बंद होणार आहे.

सोशल साईटचे युग सुरू होण्याआधी याहू मॅसेंजर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले होते. १९९८ साली सुरू झालेल्या या इन्स्टंट मॅसेंजरला जगभरात उदंड प्रतिसाद मिळाला होता. विविध रूम्सचा उपयोग करून या माध्यमातून चॅटींगचे एक नवीन दालन युजर्सला मिळाले होते. काही वर्षे याहू मॅसेंजर लोकप्रियतेच्या शिखरावर होते. मात्र हळूहळू याची लोकप्रियता घसरणीला लागली. फेसबुक व ट्विटरसारख्या मातब्बर साईटच्या उदयानंतर तर याहू मॅसेंजर नष्ट होण्याच्या मार्गावर आले. याहूने यात कालानुरूप अनेक बदल केले तरी फारसा उपयोग झाला नाही. या पार्श्‍वभुमिवर आता याहू कंपनीतर्फे आपली ही सेवा बंद करण्याचे घोषित करण्यात आले आहे. या घोषणेनुसार आता ५ ऑगस्टपासून याहू मॅसेंजर बंद होणार आहे. तत्पुर्वी युजर्सनी आपापले मॅसेजेस, चॅटींगचे आर्काईव्ह आदींना डाऊनलोड अथवा दुसरीकडे स्थलांतरीत करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच याहूने नवीन मॅसेंजर अ‍ॅप सादर केले आहे. त्यालाच आता पुढे कार्यान्वित ठेवण्यात आले असून जुने मॅसेंजर मात्र काळाच्या पडद्याआड जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here