बजाज पल्सर क्लासीक १५० (२०१८) सादर

0

बजाज ऑटो कंपनीने आपल्या पल्सर क्लासीक १५० या मॉडेलची नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बजाज पल्सर क्लासीक १५० ची नवीन आवृत्ती येणार असल्याची चर्चा होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले असून हे मॉडेल लाँच करण्यात आले आहे. याला बजाज क्लासीक पल्सर १५० (२०१८) या नावाने ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. याचे मुंबईतील एक्स-शोरूम मूल्य ६७,४३७ रूपये इतके असून ते मूळ मॉडेलपेक्षा जवळपास १० हजारांनी कमी आहे. यात मूळ आवृत्तीनुसारच १४९.५ सीसी क्षमतेचे डीटीएस-आय इंजिन देण्यात आले असून याला ५ स्पीड गिअर्सशी संलग्न करण्यात आले आहे. तथापि, यात मूळ आवृत्तीमधील अनेक फिचर्सला वगळण्यात आले आहे. यामध्ये स्प्लीट सीट, रिअर डिस्क ब्रेक, ग्राफीक्स डिझाईन आदींचा समावेश आहे. ही दुचाकी फक्त काळ्या रंगाच्या पर्यायात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे. हे मॉडेल होंडा युनिकॉर्न आणि हिरो अचिव्हर १५० या मॉडेल्सला आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here