बजाज पल्सर १५० ची ट्विन डिस्क आवृत्ती

0

बजाज कंपनीने आपल्या पल्सर १५० या दुचाकीची ट्विन डिस्क एडिशन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बजाज पल्सर १५० या मॉडेलची नवीन आवृत्ती येणार असल्याची चर्चा सुरू होती. ट्विन डिस्क एडिशनच्या माध्यमातून यावर शिक्कामोर्तब झाले आहे. नावातच नमूद असल्यानुसार याच्या दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक प्रदान करण्यात आले आहेत. यामुळे वाहकाला आपल्या दुचाकीवर नियंत्रण मिळवणे सुलभ होणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. या नवीन आवृत्तीमध्ये बजाज कंपनीने स्प्लीट सीटदेखील प्रदान केलेली आहे. याच्या जोडीला पुढील बाजूस अत्यंत दर्जेदार असे टेलीस्कोपीक फॉर्कदेखील देण्यात आले आहे. अर्थात यामुळे ही दुचाकी आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक आकर्षक दिसणारी आहे.

बजाज पल्सर १५०ची ही नवीन आवृत्ती काळ्या रंगात सादर करण्यात आली असून यावरील ग्राफीक्स हे ब्ल्यू, रेड आणि क्रोम या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये येणार आहेत. यामध्ये आधीच्या मॉडेलप्रमाणेच १४९.५ सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर, टू-व्हॉल्व्ह, डीटीएस-आय इंजिन देण्यात आले आहे. या बाईकचे दिल्लीतील एक्स-शोरूम मूल्य ७८,०१६ रूपये इतके असेल. बाजारपेठेत ही दुचाकी होंडा एक्सट्रीम, होंडा सीबी युनीकॉर्न, टिव्हीएस अपाचे आरटीआर १६० आदींसारख्या माॅडेल्सला तगडे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here