बदलला फेसबुकचा लोगो !

0
(मुख्य अ‍ॅपवरील लोगो हा आधीचाच राहणार आहे.)

फेसबुकने आपल्या लोगो अर्थात बोधचिन्हात बदल केला असून या माध्यमातून अन्य सेवांनी ठळक ओळख प्रदान करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकले आहे.

गत अनेक दिवसांपासून फेसबुकच्या लोगोमध्ये बदल करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. या पार्श्‍वभूमिवर, हा बदल करण्यात आला असून एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. यानुसार फेसबुकचा नवीन लोगो हा फेसबुक ही सोशल साईट अथवा याच्या अ‍ॅपसाठी बदलण्यात आलेला नाही. तर फेसबुक कंपनीला स्वतंत्र ओळख (आयडेंटीटी) मिळवून देण्यासाठी याला तयार करण्यात आले आहे. अर्थात, फेसबुकची मालकी असणार्‍या इन्स्टाग्राम, एफबी मॅसेंजर, व्हाटसअ‍ॅप, ऑक्युलस, वर्कप्लेस, पोर्टल आणि कॅलीब्रा आदी उपकंपन्यांसाठी हा बदललेला लोगो वापरण्यात येणार आहे. फेसबुकने काही दिवसांपूर्वीच आपल्या मालकीच्या अन्य कंपन्यांच्या नावासमोर फ्रॉम फेसबुक हे शब्द लावण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता लोगोमध्ये बदल करण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

फेसबुकचा नवीन लोगो हा विविध कंपन्यांसाठी भिन्न रंगात उपलब्ध करण्यात आलेला आहे. यात नवीन टायपोग्राफी आणि फाँट वापरण्यात आलेला आहे. येत्या काही दिवसांमध्ये सहकारी कंपन्यांच्या नावासमोर हा बदललेला लोगो वापरण्यात येणार असल्याची माहिती या ब्लॉग पोस्टमध्ये देण्यात आलेली आहे.

खालील अ‍ॅनिमेशनमध्ये फेसबुकचे बदललेले लोगो दर्शविण्यात आले आहेत.

नवीन लोगो इन्स्टाग्रामवर खालीलप्रमाणे दर्शविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here