बायरडायनॅमिकचे प्रिमीयम वायरलेस हेडफोन्स

0

बायरडायनॅमिक कंपनीने आपले अव्हेंथो हे उच्च श्रेणीतील वायरलेस हेडफोन्स भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

अव्हेंथो हे वायरलेस हेडफोन्स भारतीय ग्राहकांसाठी २४,९९९ रूपये मूल्यात सादर करण्यात आले आहेत. बायरडायनॅमिक कंपनीने मिमी हिअरिंग टेक्नॉलॉजी कंपनीसोबत साऊंड कस्टमायझेशनची प्रणाली विकसित केली आहे. यात कुणीही युजर त्याला हव्या असणार्‍या पध्दतीन संगीताचा आनंद घेऊ शकतो. यासाठी त्याला मेक इट युवर्स म्हणजेच एमआयवाय या अ‍ॅपवर त्याला हवे असणारे म्युझिक प्रोफाईल तयार करावे लागते. यानंतर त्याला या प्रकारातील संगीत ऐकता येते. ब्ल्यु-टुथच्या मदतीने हे हेडफोन्स स्मार्टफोनसह अन्य स्मार्ट उपकरणांना कनेक्ट करता येतात. हे हेडफोन्स हाय रेझोल्युशन क्षमतेच्या ध्वनीला सपोर्ट करतात. अर्थात यामुळे युजरला उच्च दर्जाच्या ध्वनीची अनुभूती घेता येते. याची डिझाईनदेखील अतिशय आकर्षक असून याच्या इयरकप्सवर नियंत्रणाची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.

हेडफोन्सच्या दीर्घ काळ वापरामुळे श्रवणशक्तीसह कानांवर मोठ्या प्रमाणात ताण येत असतो. या पार्श्‍वभूमिवर बायरडायनॅमिकच्या अव्हेंथो या मॉडेलमध्ये साऊंड वॉचिंग ही नाविन्यपूर्ण सुविधा दिलेली आहे. याच्या मदतीने संबंधीत युजर किती वेळापासू संगीत ऐकतोय आणि याचा त्याच्या कानांवर नेमका काय परिणाम होतोय? याचे सखोल विश्‍लेषण करण्यात येते. यातून त्या युजरच्या कानांना थोडी विश्रांती हवी असल्याचे आढळून आल्यास त्याला तसे सूचित केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here