बीएमडब्ल्यूच्या दोन बाईक्सच्या नोंदणीस प्रारंभ

0

बीएमडब्ल्यू मोटररॅड कंपनीने आपल्या जी ३१० आर आणि जी ३१० जीएस या दोन दुचाकींची अगावू नोंदणी सुरू केली असून लवकरच हे मॉडेल्स अधिकृतपणे लाँच करण्यात येणार आहे.

बीएमडब्ल्यू कंपनी जी ३१० आणि जी ३१० जीएस हे दोन मॉडेल्स भारतात सादर करण्यात येणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू होती. या अनुषंगाने कंपनीने आता ५० हजार रूपये भरून या मॉडेल्सच्या अगावू नोंदणीस प्रारंभ केला आहे. ही अगावू नोंदणी बीएमडब्ल्यू कंपनीच्या देशभरातील शोरूम्समधून खुली करण्यात आल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. मात्र या मॉडेल्सचे मूल्य अद्याप जाहीर करण्यात आलेेले नाही. याला अधिकृत लाँचींग कार्यक्रमात सादर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here