बीएसएनएल उभारणार बहुउपयोगी टॉवर्स

0
BSNL

बीएसएनएल कंपनीने देशात बहुउपयोगी तसेच आकर्षक दिसणारे ५० नवीन टॉवर्स उभारण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

मोबाईल टॉवर्स आता देशाच्या अगदी कान्याकोपर्‍यात उभे असल्याचे आपल्याला दिसतात. यातील सर्वात जास्त टॉवर्स हे बीएसएनएल कंपनीचे आहेत. अगदी दुसर्‍या खासगी कंपन्यादेखील बीएसएनएलकडून त्यांच्या टॉवर्सची सेवा घेत असतात. यातच आता बीएसएनएलने ५० नवीन ‘झीरो बेस’ मोबाईल टॉवर्स उभारण्याची घोषणा केली आहे. ‘झिरो बेस’ या अंतर्गत टॉवर्सला नवीन लूक प्रदान करण्यात येणार आहे. सध्याचे मोबाईल टॉवर्स थोडे विद्रूप दिसत असल्याची अनेकदा चर्चा होत असते. या पार्श्‍वभुमिवर याला आकर्षक रूप प्रदान करण्यात येणार आहे. याचसोबत या अंतर्गत मोबाईल टॉवर आता ‘मल्टीपर्पज’ अर्थात बहुउपयोगी होणार आहेत.

सध्या मोबाईल टॉवरच्या माध्यमातून फक्त ध्वनी लहरी प्रक्षेपित केल्या जातात. मात्र ‘झिरो बेस’ या संकल्पनेच्या अंतर्गत याचा अन्य बाबींसाठीही उपयोग करता येणार आहे. यात हा टॉवर वाय-फाय हॉटस्पाट म्हणूनही उपयोगात आणला जाणार आहे. यावर सिक्युरिटी कॅमेरा लाऊन परिसरावर नजरदेखील ठेवता येणार आहे. एवढेच नव्हे तर त्यावर सौर वा विद्युत दिवे लावण्याची व्यवस्थादेखील करता येणार आहे. जगातील अन्य राष्ट्रांमध्ये नोकिया, झेडटीई, हुवे, एरिक्सन आदी कंपन्यांनी यशस्वीपणे ‘झिरो बेस’ मोबाईल टॉवर्स उभारले आहेत. आता बीएसएनएलदेखील याचाच कित्ता गिरवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here