बेनक्यूचा २७ इंची मॉनिटर

0
BenQ-EW2440L-24-inch-LED-Monitor

बेनक्यू कंपनीने डोळ्यांना कमी सुखदायक असणारा २७ इंची आकारमानाचा ईडब्ल्यू२७७५झेडएच हा मॉनिटर १७५०० रूपये मुल्यात बाजारात सादर केला आहे.

संगणकाच्या मॉनिटरवर दीर्घ काळापर्यंत काम केल्यामुळे डोळ्यांवर ताण पडत असतो. यामुळे बर्‍याच कंपन्या आता डोळ्यांवर कमी ताण येईल अशा प्रकारचे मॉनिटर तयार करण्याला प्राधान्य देत आहेत. या पार्श्‍वभुमिवर आता बेनक्यू कंपनीने २७ इंची आकारमानाचा ईडब्ल्यू२७७५झेडएच हा मॉनिटर बाजारात उतारला आहे. बेनक्यूच्या ‘लो ब्ल्यू लाईट प्लस अँड ब्राईटनेस इंटिलेजियंट टेक्नॉलॉजी’च्या मदतीने दीर्घ काळापर्यंत काम करूनही डोळ्यांवर ताण येत नसल्याचा कंपनीचा दावा आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने हा डिस्प्ले आपोआप विविध प्रकाशांमध्ये ‘ब्राईटनेस’ अ‍ॅडजस्ट करत असतो. यासोबत यात स्मार्ट फोकस आणि सिनेमा मोड हे दोन फिचर्सदेखील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here