भारतात मिळणार आयपॅड प्रो-२०१८ मॉडेल

0
फेस आयडीयुक्त नवीन आयपॅड प्रो,apple-ipad-pro-2018

अ‍ॅपलने आपल्या आयपॅड प्रो-२०१८ या मॉडेलला भारतात सादर करण्यात आले असून याच्या विक्रीपूर्व नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे.

अ‍ॅपलने गत महिन्यात आयपॅड प्रो-२०१८ या नवीन आवृत्तीचे अनावरण केले होते. आता हे मॉडेल भारतीय ग्राहकांना १६ नोव्हेंबरपासून उपलब्ध करण्यात येणार आहे. याआधी याच्या विक्रीपूर्व नोंदणीस प्रारंभदेखील करण्यात आला आहे. या मॉडेलला ११ आणि १२.२ इंच आकारमानांच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आले आहे. यात वाय-फाय आणि वाय-फाय+सेल्युलर असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. ११ इंची मॉडेलच्या वाय-फाय ओन्ली या प्रकारातील मॉडेल्सचे स्टोअरेज आणि मूल्य पुढीलप्रमाणे आहे. ६४ जीबी-७१,९००; २५६ जीबी-८५९००; ५१२ जीबी-१,०३,९९० तर १ टिबी-१,३९,९९० रूपये. तर याच आकारमानात वाय-फाय+सेल्युलर या मॉडेल्सचे मूल्य हे….६४ जीबी-८५,९००; २५६ जीबी-९९९००; ५१२ जीबी-११७,९०० तर १ टिबी-१,५३,९०० रूपये. १२.९ इंच आकारमानाच्या वाय-फाय ओन्ली या प्रकारातील मॉडेल्सचे मूल्य पुढीलप्रमाणे आहे. ६४ जीबी-८९,९००; २५६ जीबी-१०३९००; ५१२ जीबी-१,२१,९०० तर १ टिबी-१,५७,९९० रूपये. तर याच आकारमानात वाय-फाय+सेल्युलर अशी सुविधा असणारे विविध मॉडेल्सचे मूल्य पुढीलप्रमाणे असणार आहे. ६४ जीबी-१०३,९००; २५६ जीबी-११७९००; ५१२ जीबी-१,३५,९०० तर १ टिबी-१,७१,९०० रूपये. हे सर्व मॉडेल्स ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.

आयपॅड प्रो (२०१८) या मॉडेलमध्ये ११ आणि १२.९ इंच आकारमानाच्या डिस्प्लेंचे पर्याय देण्यात आलेले आहेत. हे डिस्प्ले रेटीना एलसीडी आणि एज-टू-एज या प्रकारातील आहेत. याची क्षमता २३८८ बाय १६६८ पिक्सल्स असून यामध्ये प्रो-मोशन टेक या प्रणालीचा वापर करण्यात आलेला आहे. या मॉडेलमध्ये अ‍ॅपलचा ए१२एक्स बायोनिक प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस १२ तर पुढे ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. यात स्टोअरेजसाठी ६४ जीबींपासून ते १ टिबीपर्यंत पर्याय दिलेले आहेत. यासोबत नवीन अ‍ॅपल पेन्सीलदेखील सादर करण्यात आलेली आहे. दुसर्या पिढीतील ही पेन्सील अतिशय कार्यक्षम असून याच्या मदतीने रेखाटन करण्यासह नोटस् घेता येणार आहेत. यामध्ये वायरलेस चार्जींगची सुविधा देखील दिलेली आहे. यामध्ये फेस आयडी हे विशेष फिचर देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here