महिंद्राची ई-रिक्षा बाजारपेठेत दाखल

0

महिंद्रा कंपनीने इलेक्ट्रीक चार्जींगवर चालणारी ई-अल्फा मिनी ही ई-रिक्षा भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.

देशातील बहुतांश वाहन उत्पादक कंपन्यांनी इलेक्ट्रीक चार्जींगवर चालणारे विविध मॉडेल्स सादर करण्यास प्रारंभ केला आहे. यात आता महिंद्राच्या ई-अल्फा मिनी या मॉडेलची भर पडली आहे. या तीनचाकी रिक्षाचे दिल्लीतील एक्स-शोरूम मूल्य १.१२ लाख रूपये असेल. एकदा चार्ज केल्यानंतर ही ई-रिक्षा तब्बल ८५ किलोमीटरपर्यंत अंतर कापू शकत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर या वाहनाचा अधिकतम वेग २५ किलोमीटर प्रति-तास इतका असेल. यात १२० अँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून याला १००० वॅट क्षमतेच्या मोटर आणि कंट्रोलरची जोड देण्यात आली आहे. ही ई-रिक्षा खरेदी करणार्‍यांसाठी कंपनीने उत्तम ऑफर्स देऊ केल्या आहेत. यात दोन वर्षाची वॉरंटी, सुलभ हप्त्यांची सुविधा, मोफत बॅटरी रिप्लेसमेंट आदींचा समावेश आहे. महिंद्रा कंपनीचे देशभरात उत्तम विक्री-पश्‍चात सेवा प्रदान करणारे नेटवर्क असून याचा ग्राहकाला लाभ होणार आहे. यात ४+१ अशी आसन व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे.

देशात सध्या ई-रिक्षा लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. शहरांतर्गत वाहतुकीसाठी हा अतिशय किफायतशीर आणि अर्थातच पर्यावरणानुकुल पर्याय उपलब्ध झाल्यामुळे याकडे कल वाढला आहे. या पार्श्‍वभूमिवर महिंद्रा ई-अल्फा मिनी या मॉडेलचे बाजारपेठेतील आगमन ई-रिक्षा या क्षेत्रात आकर्षणाचा केंद्रबिंदू बनू शकते. महिंद्रा कंपनीने आधीच चार्जींगवर चालणार्‍या वाहनांच्या उत्पादनात आघाडी घेतली आहे. या कंपनीने आधी ई२०प्लस, ईव्हेरिटो, ईसुप्रो आदी विविध मॉडेल्स बाजारपेठेत उतारले आहेत. यात आता ई-अल्फा मिनी या मॉडेलची भर पडली आहे. लवकरच महिंद्रा कंपनी अजून एक ई-रिक्षा लाँच करण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here