मायक्रोमॅक्सचे उत्तम बॅटरी असणारे दोन स्मार्टफोन

0

मायक्रोमॅक्स कंपनीने तब्बल ४००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असणारे कॅनव्हास ज्युस ३ आणि कॅनव्हास ज्युस ३ प्लस हे दोन स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.

Micromax-Canvas-Juice-3

अनेक कंपन्या बॅटरीला केंद्रस्थानी ठेवून स्मार्टफोन सादर करत आहेत. मायक्रोमॅक्सनेही याचाच कित्ता गिरविला आहे. या अनुषंगाने कॅनव्हास ज्युस ३ आणि कॅनव्हास ज्युस ३ प्लस हे दोन स्मार्टफोन सादर करण्यात आले आहे. वर नमुद केल्याप्रमाणे दोन्ही स्मार्टफोन ४०००मिलीअँपीअर क्षमतेच्या बॅटरीने सज्ज आहेत. तसेच यातील बहुतांश फिचर्सही समान आहेत. दोन्ही मॉडेलमध्ये १.३ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसर असून रॅम दोन जीबी आहे. पहिला स्मार्टफोन हा ८ तर प्लस मॉडेल हे १६ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असणारा आहे. दोघांमध्ये मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्ट आहे. हे दोन्ही स्मार्टफोन अनुक्रमे लॉलीपॉप ५.० आणि लॉलिपॉप ५.१ या प्रणालीवर चालणारे आहेत.

कॅनव्हा ज्युस ३ मध्ये पाच इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा तसेच कॉर्निंग गोरिला ग्लास थ्रीचे आवरण असणारा आयपीएस डिस्प्ले आहे. तर कॅनव्हास ज्युस ३ प्लस हा स्मार्टफोन ५.५ इंच आकारमानाचा आणि याच क्षमतेच्या डिस्प्लेने सज्ज आहे. कॅनव्हास ज्युस ३ हा स्मार्टफोन ८,९९९ रूपयांना बाजारपेठेत उतारण्यात आला आहे. मात्र प्लस मॉडेलचे मुल्य अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here