मायक्रोमॅक्सचे दोन किफायतशीर स्मार्टफोन

0

मायक्रोमॅक्सने भारत ५ इन्फीनिटी एडिशन आणि भारत ४ दिवाली एडिशन हे दोन अत्यंत किफायतशीर मूल्य असणारे स्मार्टफोन बाजारपेठेत उतारले आहेत.

मायक्रोमॅक्सने आजवर एंट्री लेव्हलच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केले आहे. या अनुषंगाने भारत ५ इन्फीनिटी एडिशन आणि भारत ४ दिवाली एडिशन हे नुकतेच सादर करण्यात आलेले स्मार्टफोनही याच प्रकारातील आहे. यांचे मूल्य अनुक्रमे ५,८९९ आणि ४,२४९ रूपये इतके असून देशभरातील शॉपीजमधून याला खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. रिलायन्स जिओने यासोबत आकर्षक ऑफर सादर केली असून याच्या अंतर्गत ग्राहकाला अतिरिक्त २५ जीबी फोर-जी डाटा देण्यात येणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स अँड्रॉइड गो या प्रणालीवर चालणारे आहे. अर्थात यात सर्वात पहिल्यांदा नवनवीन अपडेटस् देण्यात येणार आहेत.

कॅमेर्‍यांचा विचार केला असता, भारत ५ इन्फीनिटी एडिशन या मॉडेलच्या मागे आणि पुढे प्रत्येकी ५ मेगापिक्सल्सचे कॅमेरे देण्यात आले आहेत. तर भारत ४ दिवाली एडिशन या मॉडेलमध्ये ५ आणि २ मेगापिक्सल्सचे कॅमेरे दिलेले आहेत. भारत ५ इन्फीनिटी एडिशनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक हे फिचर्स दिलेले असले तरी भारत ४ दिवाली एडिशनमध्ये याचा समावेश करण्यात आलेला नाहीय. भारत ५ इन्फीनिटी मॉडेलमध्ये तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. तर दुसर्‍या मॉडेलमध्ये २,००० मिलीअँपिअरची बॅटरी असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here