मायक्रोमॅक्स ‘कॅनव्हास ६’ आणि ‘६ प्रो’चे अनावरण

0

मायक्रोमॅक्स कंपनीने कॅनव्हास ६ आणि कॅनव्हास ६ प्रो हे दोन फ्लॅगशीप स्मार्टफोन्स १३,९९९ रूपयांना सादर करण्याची घोषणा केली आहे.

मायक्रोमॅक्स कंपनी कॅनव्हास मालिकेत नवीन स्मार्टफोन सादर करणार असल्याची कधीपासूनच चर्चा सुरू होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. आज कंपनीने कॅनव्हास ६ आणि कॅनव्हास ६ प्रो हे दोन मॉडेल्स सादर केले आहेत. यातील कॅनव्हास ६ प्रो या मॉडेलची नोंदणी आजपासून मायक्रोमॅक्सच्या ई-स्टोअरवरून सुरू झाली असून दुसर्‍या मॉडेलची बुकींग आठवडाभरात सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच आकारमानाचे आणि फुल एचडी अर्थात १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचे डिस्प्ले देण्यात आले आहेत. तर दोन्ही मॉडेल्समध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. मात्र कॅनव्हास ६ या मॉडेलची रॅम चार जीबी तर स्टोअरेज ३२ जीबी तर कॅनव्हास प्रो या स्मार्टफोनची ३ जीबी रॅम व १६ जीबी इनबिल्ट स्टोअरेज आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये १३ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा आहे. मात्र कॅनव्हास ६ मध्ये सेल्फीसाठी ८ तर प्रो मॉडेलमध्ये ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे कॅमेरे आहेत. पहिल्या मॉडेलमध्ये मेटलची बॉडी आणि फिंगरप्रिंट स्कॅनर असले तरी कॅनव्हास ६ प्रो या स्मार्टफोनमध्ये मात्र हे फिचर्स दिलेले नाहीत.

दरम्यान, मायक्रोमॅक्स कंपनीने आता आपली आगामी सर्व उत्पादने स्वत:च्या ई-स्टोअरवरून विक्री करण्याचा निर्णयदेखील जाहीर केला आहे. अर्थात याबाबत मायक्रोमॅक्सने शाओमीचे अनुकरण केल्याचे दिसून येत आहे. तसेच कंपनीने येत्या काही दिवसांमध्ये बोल्ट सुप्रीम, बोल्ट सुप्रीम २, कॅनव्हास स्पार्क ३, कॅनव्हास स्पार्क २+, कॅनव्हास इव्होक, कॅनव्हास मेगा२, बोल्ट क्यू३८१ आणि कॅनव्हास युनाईट ४ हे मॉडेल्स लॉंच करण्याची घोषणादेखील केली आहे. तर मायक्रोमॅक्सने आपली ‘अराऊंड यू’ ही सेवा आता ‘अराऊंड सर्व्हीस’ यात परिवर्तीत केली आहे. यात ग्राहकाला आपल्या स्क्रीनच्या उजव्या बाजूस असणार्‍या एकाच ठिकाणी आपले सर्व ऍप्स शोधता येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here