मायक्रोमॅक्स भारत ५ स्मार्टफोन दाखल

0

मायक्रोमॅक्स कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपल्या भारत या मालिकेतील भारत ५ हा स्मार्टफोन ५,५५५ रूपये मूल्यात सादर करण्याची घोषणा केली आहे.

मायक्रोमॅक्स कंपनीने भारत मालिकेत अत्यंत किफायतशीर मॉडेल्स सादर केले आहेत. यात आता भारत ५ या स्मार्टफोनची भर पडली आहे. सप्टेबर महिन्यात लाँच करण्यात आलेल्या भारत ४ या मॉडेलची ही अद्ययावत आवृत्ती मानली जात आहे. हा स्मार्टफोन काळ्या रंगाच्या पर्यायात देशभरातील शॉपीजमधून ५ डिसेंबरपासून उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मायक्रोमॅक्स कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे. यासोबत ग्राहकांना काही ऑफरदेखील देण्यात आल्या आहेत. यात व्होडाफोनच्या विद्यमान ग्राहकांना कोणत्याही प्लॅनच्या रिचार्जसोबत पाच महिन्यापर्यंत अतिरिक्त १० जीबी इतका डाटा मिळणार आहे. या मॉडेलला ‘पॉवर ऑफ ५’ ही टॅगलाईन देण्यात आली आहे.

मायक्रोमॅक्स भारत ५ या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात क्वॉड-कोअर मीडियाटेक एमटी६७३७ प्रोसेसर असेल. याची रॅम १ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडीच्या मदतीने वाढविण्याची सुविधा असेल. याच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात ‘बोके इफेक्ट’ची सुविधा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ५ मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. यात तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल २७ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. मायक्रोमॅक्स भारत ५ या स्मार्टफोनमध्ये स्मार्ट की हे विशेष फिचर देण्यात आले आहे. याच्या मदतीने छायाचित्र काढता येत असून स्क्रीनशॉटही काढता येणार आहे. तर या मॉडेलमध्ये २२ भारतीय भाषांचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. तर यात फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असून यासोबत ब्ल्यु-टुथ, जीपीएस, वाय-फाय आदी सुविधा असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here