मायक्रोसॉफ्टच्या रोबो ऑपरेटींग सिस्टीमचे आगमन

0
रोबो ऑपरेटींग सिस्टीम, robot operating system

मायक्रोसॉफ्टने रोबो ऑपरेटींग सिस्टीमची घोषणा केली असून विंडोज १० प्रणालीच्या आगामी अपडेटमध्ये याला संलग्न करण्यात आले आहे.

रोबो हे भविष्यातील हार्डवेअर तर आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स हे सॉफ्टवेअर असल्याचे म्हणले जाते. किंबहुना याची प्रचिती आतापासूनच येऊ लागली आहे. म्हणजेच सध्या स्मार्ट उपकरणांचे युग असले तरी लवकरच आपण यंत्रमानवांच्या कालखंडात प्रवेश करणार आहोत. आधीच्या तसेच विद्यमान उपकरणांच्या कार्यान्वयनासाठी विविध ऑपरेटींग सिस्टीम्स वापरात आहेत. म्हणजे आपण संगणकासाठी विंडोज/मॅक तर स्मार्टफोनसाठी अँड्रॉइड/आयओएस आदी ऑपरेटींग सिस्टीम्सला प्राधान्य देत आहोत. याच प्रकारे रोबो उपकरणांसाठी ऑपरेटींग सिस्टीम तयार करण्याचे प्रयत्न बर्‍याच कंपन्यांनी सुरू केले आहेत. या अनुषंगाने मायक्रोसॉफ्टने रोबो ओएस १ (आरओएस१) या ऑपरेटींग सिस्टीमची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात ही प्रणाली स्वतंत्रपणे देण्यात आलेली नाही. यासाठी याला विंडोज १० या ऑपरेटींग सिस्टीमच्या या महिन्यात जाहीर करण्यात येणार्‍या अपडेटमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच विंडोज १०च्या अपडेटमध्येच याचा समावेश करण्यात येणार आहे.

आरओएस१ या ऑपरेटींग सिस्टीममध्ये मशिन लर्नींग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, कंप्युटर व्हिजन, क्लाऊड सर्व्हीसेस आदींचा समावेश करण्यात आला आहे. गृह, व्यावसायिक, औद्योगीक आदी क्षेत्रांमधील रोबो उपकरणांमध्ये या ऑपरेटींग सिस्टीमचा वापर होणार आहे. यासोबत मायक्रोसॉफ्टने आरओएस इंडस्ट्रीयल कॉन्सोर्टीयम या संस्थेशी संलग्न होण्याची घोषणादेखील केली आहे. हा एक मुक्तस्त्रोत विकास मंच असून याच्या माध्यमातून रोबो ऑपरेटींग सिस्टीमच्या वापरला गती मिळणार आहे. या माध्यमातून रोबो ओएसच्या विकासासाठी मायक्रोसॉफ्टने विविध आयामांमधून प्रयत्न सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here