मायक्रोसॉफ्टच्या सरफेस प्रो ६ हायब्रीड मॉडेलची घोषणा

0
मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो ६, microsoft surface pro 6

मायक्रोसॉफ्टने आपल्या मेगा लाँचींग कार्यक्रमात सरफेस प्रो ६ या हायब्रीड लॅपटॉपची घोषणा केली असून याचे अनावरण करण्यात आले.

साधारणपणे वर्षाच्या उत्तरार्धात अनेक टेक कंपन्या आपापली नवीन उत्पादने लाँच करत असतात. काही दिवसांपूर्वीच नवीन आयफोन लाँच करण्यात आले असून येत्या काही दिवसांमध्ये गुगल आपल्या पिक्सेल मालिकेत नवीन मॉडेल्स सादर करणार आहेत. या अनुषंगाने मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या आज पार पडलेल्या लाँचींग कार्यक्रमात विविध प्रॉडक्टची घोषणा केली. यामध्ये सर्वात लक्षवेधी ठरले ते सरफेस प्रो ६ हे मॉडेल ! हा लॅपटॉप असला तरी याला कि-बोर्ड विलग करून टॅबलेट म्हणून वापरणे शक्य आहे. अर्थात हे हायब्रीड या प्रकारातील मॉडेल आहे. अलीकडेच हायब्रीड मॉडेल्सची लोकप्रियता वाढली असून या अनुषंगाने सरफेस प्रो ६ मॉडेलमध्ये अनेक अद्ययावत फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे याला मॅट ब्लॅक या रंगाचे बाह्यांग प्रदान करण्यात आले आहे. या मालिकेत हा रंग सर्वात पहिल्यांदा वापरण्यात आलेला आहे. याचा लूक हा अतिशय आकर्षक असाच असून कुणालाही तात्काळ आकृष्ट करून घेणारा आहे.

सरफेस प्रो ६ या मॉडेलमध्ये इंटेलचे आठव्या पिढीतील आय-५ हा प्रोसेसर देण्यात आले आहेत. हा लॅपटॉप आदीच्या मॉडेलमध्ये तब्बल ६८ टक्क्यांनी अधिक वेगवान असल्याचा दावा या लाँचींग कार्यक्रमात करण्यात आला. यात १६ जीबीपर्यंत रॅमचे पर्याय देण्यात आले आहेत. या मॉडेलमध्ये अतिशय उत्तम दर्जाची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १३.५ तासांचा बॅकअप देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये १२.३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. तथापि, यामध्ये आधीच्या मॉडेलनुसारच कनेक्टीव्हिटीचे पर्याय दिलेले आहेत. म्हणजेच सध्या प्रचलीत असणार्‍या युएसबी टाईप-सी पोर्टचा यात समावेश करण्यात आलेला नाहीय. या मॉडेलच्या विविध व्हेरियंटचे मूल्य ८९९ डॉलर्सपासून सुरू होणार आहे. याला लवकरच भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here