मारूती सुझुकीच्या ‘व्हिटारा ब्रेझा’चे अनावरण

0

आजपासून दिल्ली येथे सुरू झालेल्या ‘ऑटो एक्सपो’मध्ये देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असणार्‍या मारूती सुझुकीने ‘व्हिटारा ब्रेझा’ ही नवीन एसयुव्ही सादर केली आहे.

आज ऑटो एक्सपोच्या पहिल्याच दिवशी मारूती सुझुकीने ‘व्हिटारा ब्रेझा’ हे मॉडेल सादर केले आहे. प्रारंभी याचे फक्त डिझेल मॉडेल सादर करण्यात येणार आहे. मात्र यानंतर पेट्रोल व्हेरियंटही लॉंच करण्यात येणार आहे. यात ३०० डीडीआयएस इंजिन लावण्यात आले असून या कारमध्ये पाच मॅन्युअल गिअर्स असणार आहेत. विशेष बाब म्हणजे या ड्रायव्हरसाठी एयर बॅग देण्यात आली आहे. आजच्या कार्यक्रमात या मॉडेलचे मुल्य जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र याचे विविध व्हेरियंटस ६ ते ८ लाख रूपयांमध्ये मिळतील असे मानले जात आहे. पुढील वर्षी हे मॉडेल ग्राहकांसाठी सादर करण्यात येणार असल्याचे आज मारूती सुझुकी कंपनीने जाहीर केले आहे. बाजारपेठेत महिंद्रा टियुव्ही ३००, फोर्ड इकोस्पोर्ट, रेनॉ डस्टर, हुंदाई क्रेटा आदी विद्यमान मॉडेल्सला मारूती सुझुकीच्या ‘व्हिटारा ब्रेझा’च्या माध्यमातून तीव्र स्पर्धा निर्माण होणार असल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here