मारूती सुझुकीने विकली २ करोड वाहने

0

मारूती सुझुकी कंपनीने तब्बल २ कोटी वाहनांच्या विक्रीचा महत्वाचा टप्पा पार केला असून यातून एक विक्रम प्रस्थापित केला आहे.

मारूती सुझुकी कंपनीने आपले दोन कोटीवे वाहन नुकतेच गुजरातमध्ये स्वीफ्ट झेड प्लस या मॉडेलच्या स्वरूपात विकण्यात आले आहे. १९८३ साली मारूती या नावाने अस्तित्वात आलेल्या या कंपनीने नंतर मारूती सुझुकी हे नाव धारण केले. याच नावाने आज ही कंपनी कार्यरत आहे. अर्थात ३५ वर्षे आणि पाच महिन्यानंतर या कंपनीने दोन कोटी वाहनांच्या विक्रीचा टप्पा पार केला आहे. या कालखंडात मारूती सुझुकी अल्टो या मॉडेलने सर्वाधीक म्हणजे ३१.७ लाख वाहन विक्रीची मजल मारली आहे. अजूनदेखील हे मॉडेल लोकप्रिय असल्यामुळे यात वाढ होण्याची शक्यता आहे. या पाठोपाठ मारूती ८०० या मॉडेलने २९.१ लाख विक्रीचा तर वॅगनआरने २१.३ लाख विक्रीचा टप्पा गाठला आहे.

सध्या मारूती सुझुकी कंपनीचे तीन कारखाने आहेत. यातील गुरगाव व मानेसर येथे संयुक्त तर गुजरातमध्ये सुझुकीच्या मालकीचे युनिट आहे. या तिन्ही युनिटमधून या कंपनीच्या सर्व मॉडेल्सचे उत्पादन होत असते. सध्या मारूती सुझुकी कंपनी १६ मॉडेल्सचे उत्पादन करत असून यात स्वीफ्ट डिझायर हे सर्वाधीक लोकप्रिय आहे. या पाठोपाठ व्हिटारा ब्रेझादेखील ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. दरम्यान, मारूती सुझुकी कंपनी आपल्या वाहनांना युरोप, आफ्रीका, दक्षिण अमेरिका खंडातील विविध देशांना निर्यात करते. याशिवाय जपानसह अन्य पोर्वात्य देशातही या कंपनीच्या वाहनांची विक्री होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here